22 September 2020

News Flash

रितेशने विचारलं अबरामकडून काय शिकलास? शाहरुखने दिलं ‘हे’ उत्तर

वाचा, शाहरुखने काय दिलं उत्तर

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा आता पडद्यावरील वावर कमी झाला आहे. त्याचे बरेचसे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरताना दिसत आहेत. मात्र तरीदेखील तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. शाहरुखने ट्विटवर #AskSRK हा हॅशटॅग सुरु केला आहे. यामध्ये तो चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतो. या प्रश्नांमध्ये अभिनेता रितेश देशमुखने त्याला एक प्रश्न विचारला असून शाहरुखनेदेखील त्याला हजरजबाबीपणे उत्तर दिलं.

‘अबरामकडून तू कोणती गोष्ट शिकलास?’, असा प्रश्न रितेशने शाहरुखला विचारला. त्यावर शाहरुखनेही अत्यंत सुंदर उत्तर दिलं. “जेव्हा तुम्ही खूप उदास असता,खूप भूक लागली असते किंवा राग आलेला असतो. त्यावेळी मन मोकळं करण्यासाठी आपला आवडता व्हिडीओ गेम खेळता खेळता थोडंसं रडून घ्या”, असं उत्तर शाहरुखने दिलं.

आणखी वाचा : ‘परदेसी परदेसी’ गाण्यातील ‘ही’ अभिनेत्री आता काय करते?

दरम्यान, शाहरुखचं उत्तर वाचल्यानंतर अनेकांनी त्याच्या हजरजबाबीपणाचं कौतुक केलं आहे. शाहरुखचा सध्या कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. झिरो या चित्रपटानंतर तो कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. त्यामुळे निदान २०२० या नवीन वर्षात तरी त्याचा चित्रपट येणार की नाही याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 1:15 pm

Web Title: shahrukh khan abram ritesh deshmukh life lesson tweet ssj 93
Next Stories
1 “मन्नत’मध्ये एक खोली भाड्याने हवी’; नेटकऱ्याच्या मागणीला शाहरुखचं भन्नाट उत्तर
2 ‘तान्हाजी’मधील रायबा आहे लोकप्रिय बालकलाकार; जाणून घ्या त्याच्याविषयी
3 अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात; कंगना रणौतचं वादग्रस्त विधान
Just Now!
X