News Flash

…तेव्हा समजलं बिग बी अन् माझ्यातलं अंतर; शाहरुखने सांगितला ‘मोहब्बतें’च्या सेटवरचा अनुभव

शाहरुखने सांगितला पहिल्यांदाच अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो, व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो. यावेळी तो महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे चर्चेत आहे. “पहिलाच सीन करताना जाणवलं मी बिग बींसमोर किती लहान आहे” असं म्हणत त्याने अमिताभ यांची तोंड भरुन स्तुती केली आहे.

अवश्य पाहा – महाराष्ट्रात राहून तुला मराठीची लाज का वाटते?; महेश टिळेकरांचा जान कुमारला संतप्त सवाल

‘मोहब्बतें’ हा बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २००० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज २० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने एका चाहत्याने शाहरुखला विचारलं, तुला आमिताभ यांच्यासोबत काम करताना कसं वाटल? यावर तो म्हणाला, “बिग बींसोबत पहिलाच सीन करताना मला जाणवलं, ते किती मोठे आहेत अन् मी किती लहान.” अशा शब्दात त्याने अमिताभ यांची स्तुती केली. त्याच हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “४ हजार कोटी द्या चित्रपट ऑनलाईन रिलीज करतो”; निर्मात्याची खुली ऑफर

२००० साली प्रदर्शित झालेला ‘मोहब्बतें’ हा बॉलिवूडमधील एक सुपरहिट चित्रपट आहे. शाहरुख आणि अमिताभ यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. आमिताभ आणि शाहरुखसोबतच ऐश्वर्या राय, उदय चोप्रा, किम शर्मा, जुगल हंसराज यांसारख्या अनेक नामांकित कलाकार या चित्रपटात झळकले होते. जबरदस्त गाणी आणि स्टारकास्टमुळे आजही हा चित्रपट तितकाच चर्चेत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 2:27 pm

Web Title: shahrukh khan amitabh bachchan mohabbatein mppg 94
Next Stories
1 आता श्रद्धा कपूर साकारणार ‘इच्छाधारी नागिण’
2 आता कुमार सानूची ‘जान’ वाचणं कठीण आहे; शालिनी ठाकरेंचा इशारा
3 बिग बॉस व्यवस्थापन आणि जान कुमार सानूनं महाराष्ट्राची माफी मागावी; आदेश बांदेकरांची मागणी
Just Now!
X