News Flash

पुण्यातील त्या सौंदर्यवती तरुणीमुळे शाहरुखचा सेल्फी व्हायरल

नेटीझन्समध्ये तरुणीचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता

अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘रईस’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बॉक्स ऑफिसवर त्याच्या या चित्रपटाने केलेली कमाईमध्ये शाहरुखने केलेल्या प्रमोशनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शाहरुखने आपल्या चित्रपटासाठी वेगवेगळ्या मार्गाने त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाचे यश पाहता शाहरुखचे कष्ट वाया गेले नाहीत असे म्हणता येईल. दरम्यान शाहरुखने प्रमोशन दरम्यान अनेक फंडे आजमविल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही शाहरुखने अनेक ठिकाणी प्रमोशन केल्याचे दिसले. यामध्ये तो चक्क पुण्यात एका अनोख्या पद्धतीने प्रमोशन करताना दिसला. पुण्यातील सिम्बायोसिस कॅम्पसला देखील शाहरुखने भेट दिली होती. सिम्बायोसिसच्या कॅम्पसमध्ये तरुणाईशी चर्चा करताना शाहरुखने याठिकाणी एक सेल्फी घेतला होता.

दरम्यान, पुण्यातील तरुणाईसोबत घेतलेला  हा सेल्फी शाहरुखने फेसबुकवरु शेअर केला होता. त्याचा पुण्यातील हा सेल्फी चांगलाच व्हायरला होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सेल्फी व्हायरल होण्याचे कारण शाहरूखचा लूक नाही तर या सेल्फीमध्ये शाहरुख खानच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली एक तरुणीने सर्वांच्या आकर्षित करताना दिसत आहे. शाहरुख सेल्फी घेत असताना अनेक तरुणींसोबत हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करुन उभी असणारी तरुणी नेटीझन्सना घायाळ केले आहे. नेटीझन्स या फोटोवर अनेक प्रतिक्रिया नोंदवत असून कोणी या तरुणीला सौंदर्यवतीची उपमा देताना दिसत आहे. तर कोणी तिची तुलना मॉडेलसोबत करताना दिसते. शाहरुखने देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या सौंदर्यवती संदर्भात शाहरुखने देखील ट्विटरच्या माध्यमातून टीपण्णी केली आहे. त्यामुळे आता सर्वांना या तरुणीचे नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

पुण्यातल्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये तो ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. यावेळी त्याने ‘ओ जालिमा’ या त्याच्या आवडत्या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत नृत्य केले होते. शाहरुखचे नृत्य पाहून तिथल्या विद्यार्थ्यांनी शाहरुखला साथ दिल्याचे पाहायला मिळाले होते. शाहरुखने त्याचे हात उंचावून त्याची सिग्नेचर पोझ केली तेव्हा तरुणाईचा जल्लोष केल्याचे दिसले होते. शाहरुखने यावेळी त्याचे ‘रईस’मधील प्रसिद्ध संवादही बोलून दाखवले. शाहरुखने त्याच्या चाहत्यांसोबत यावेळी ‘शेरों का जमाना होता है..’आणि ‘अम्मीजान केहती थी, कोई धंदा छोटा नहीं होता और धंदे से बडा कोई धर्म नही होता..’ हे तरुणाईचे आवडते संवाद त्यांच्यासोबत बोलताना शाहरुखनेही खूपच धम्माल केली होती.‘रईस’ चित्रपटातील संवादांशिवाय ‘डॉन’, ‘जब तक है जान’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ यांसारख्या सिनेमातले त्याचे प्रसिद्ध संवाद बोलून दाखवले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 10:52 pm

Web Title: shahrukh khan and beautiful girl selfie viral on social media 2
Next Stories
1 बॉलिवूडच्या खिलाडीने दिला मधुमेह टाळण्याचा सल्ला
2 नर्गिस उदयला पुन्हा भाव देणार का?
3 बॉलिवूड फॅशनिस्टा सोनम ‘रईस’ शाहरुख सोबत स्क्रिन शेअर करणार?
Just Now!
X