News Flash

नव्या भूमिकेसाठी किंग खान सज्ज; लवकरच सुरु होणार ‘या’ चित्रपटाची शुटींग

शाहरुखचे आगमी तीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

२०१८ साली प्रदर्शित झालेला ‘झिरो’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर शाहरुख फारसा कोणत्या चित्रपटात झळकला नाही. मात्र, लवकरच तो ‘पठाण’, ‘सनकी’ आणि अन्य एका चित्रपटात झळकणार आहे. यापैकी सनकी या चित्रपटाचं येत्या काळात चित्रीकरण सुरु होणार असल्याचं ‘पिंकव्हिला’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली कुमार यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख झळकणार आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव अधिकृतरित्या जाहीर झालं नसून या चित्रपटाचं नाव या सनकी असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एटली कुमार पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटासाठी काम करणार आहेत.

दरम्यान, ’सनकी’ या चित्रपटात शाहरुख डबल रोल साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘डुप्लिकेट’ आणि ‘डॉन’ या चित्रपटानंतर शाहरुख तिसऱ्यांदा दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यात तो वडील आणि मुलगा अशा दोन भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 2:24 pm

Web Title: shahrukh khan fly out atlees team next month mumbai team dcp 98
Next Stories
1 बिपाशाने करणसोबत शेअर केला रोमॅण्टिक फोटो; म्हणाली…
2 लग्नानंतर नेहाचा पहिला करवाचौथ; शेअर केला खास व्हिडीओ
3 सुबोध भावेची नवीन मालिका या तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X