News Flash

शाहरुखचा ‘रईस’ १० कोटीमुळे ‘मुश्किल’मध्ये येण्याचे संकेत

'त्या' अंडर्ल्डवर्ड डॉनच्या मुलाने शाहरुखकडे मागितले १० कोटी

शाहरुख खान

बॉलिवूड बादशहा शाहरुख खान लवकरच ‘रईस’ आणि ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रईस चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची संकेत दिसत आहेत. करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटासारखी परिस्थिती शाहरुख खानवर येण्याची निर्माण झाली आहे. रईस चित्रपटाचा ट्रेलर ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटासोबत प्रदर्शित करण्यात येणार आहे. यापूर्वी पाकिस्तान अभिनेत्री माहेरा खान हिच्या भूमिकेमुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपाटाच्या विरोधावेळी रईस अंधातरी राही अशा चर्चा रंगल्या होत्या. माहेरा खानमुळे निर्माण झालेला वाद मिटल्यानंतर आता शाहरुखवर दुसरे मोठे संकट आले आहे.

‘रईस’ हा चित्रपट गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती चित्रपटाचे कथानक फिरताना दिसणार आहे. दरम्यान चित्रपटातील भूमिका उठावदार करण्यासाठी शाहरुख खानने लतीफच्या मुलाची भेट घेतली होती. लतिफचा मुलगा मुश्ताक अहमदने शाहरुखला सहकार्य देखील केले. पण आता त्याने शाहरुखकडे १० कोटीची मागणी केल्याची चर्चा आहे. मुश्ताकने पैशाची मागणी केल्यानंतर शाहरुखने त्याला भेटण्यास टाळाटाळ केली. इंग्रजी वृत्तपत्र ‘डिएनए’ ने दिलेल्या वृत्तानुसार, मुश्ताकने शहारुख कडे १० कोटीची मागणी केली आहे. तसेच सध्या शाहरुखच्या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये आडथळे निर्माण करण्यासाठी मुश्ताक तयारी करत असल्याची देखील चर्चा आहे. ‘रईस’ चित्रपट  पुढील वर्षी  हृतिक रोशनचा ‘काबिल’ आणि अजयचा ‘बादशाहो’ प्रदíशत झाल्यानंतर  २६ जानेवारीला प्रदíशत करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 9:53 pm

Web Title: shahrukh khan movie raees in controversy after 10 crore demand for release
Next Stories
1 अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ सिनेमात असणार आहे खरा ‘ट्विस्ट’
2 ‘रॉक ऑन २’ चे हे आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन
3 ‘एक शून्य तीन’ नाटकातून स्वानंदीचे रंगभूमीवर पदार्पण
Just Now!
X