29 September 2020

News Flash

या कारणामुळे शाहरुखला परत करावं लागलं ‘द लायन किंग’साठी डबिंग

या चित्रपटातील चित्रपटातील ‘मुफसा- सिम्बा’ या वडील मुलाच्या जोडीला शाहरुख आणि त्याचा मुलगा आर्यनने आवाज दिला आहे.

नव्वदच्या दशकात आलेल्या कार्टुन कॅरेक्टरपैकी ‘सिम्बा’ या कार्टुनने काही वेगळीच जादू केली होती. खूप वर्षांपूर्वी याच ‘सिम्बा’ कार्टुन कॅरेक्टरवर आधारित ‘द लायन किंग’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाने बच्चे कंपनीवर एक वेगळी छाप उमटवली होती. आता हाच चित्रपट एका नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘द लायन किंग’च्या हिंदी चित्रपटातील भूमिकांना काही नामवंत कलाकारांनी आवाज दिला आहे.

या चित्रपटातील चित्रपटातील ‘मुफसा- सिम्बा’ या वडील मुलाच्या जोडीला शाहरुख आणि त्याचा मुलगा आर्यनने आवाज दिला आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुखने एक व्हिडीओ शेअर केला होता. ‘सिम्बा’ या मुख्य भूमिकेला आर्यनने आवाज दिला आहे. आता काही कारणांमुळे एका सीनसाठी शाहरुखला पुन्हा डबिंग करावे लागले आहे.

शाहरुखने सांगितले की, “आम्ही थिएटरमध्ये बसून डबिंग ऐकत होतो. तेव्हा मला डबिंग तज्ञांनी सांगितले की, माझा आणि आर्यनचा आवाज खूप सारखा ऐकू येतोय. म्हणून मला त्या सीनसाठी परत आवाज द्यावा लागला. मला कधीच असे वाटले नव्हते की, माझा आणि आर्यनचा आवाज इतका सारखा असेल. पण, हे ऐकून मला खूप आनंद झालाय.”

टीझरमध्ये या दोघांचा आवाज ऐकून प्रेक्षकही अवाक झाले आहेत. १९ जुलैला ‘द लायन किंग’चा रिमेक प्रदर्शित होणार आहे. १९९४ मध्ये आलेल्या मूळ ‘द लायन किंग’चा हा रिमेक असणार आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर हा चित्रपट अधिक प्रभावीपणे पडद्यावर दाखवण्याचा यावेळी डिझ्नेचा प्रयत्न असणार आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 2:19 pm

Web Title: shahrukh khan mufsa aaryan khan simba lion king djj 97
Next Stories
1 चित्रपट न आवडल्याने रितेशने चाहत्याला परत दिले पैसे, पहा ट्विट
2 तापसी अक्षयला का म्हणतेय, ‘अब शेअररिंग अॅण्ड केअरिंग की बारी है’
3 अफेअरच्या चर्चांबाबत परिणीती चोप्रा म्हणतेय ..
Just Now!
X