News Flash

आर माधवनच्या चित्रपटात शाहरुख साकारणार भूमिका?

जाणून घ्या त्याच्या भूमिकेविषयी..

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा २०१८मध्ये ‘झीरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर शाहरुखने कोणताही चित्रपट साइन केला नव्हता. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर आता शाहरुखने तीन चित्रपट साइन केले असल्याचे म्हटले जाते. तो राजकुमार हिराणी यांच्यासोबत एका चित्रपटात काम करणार आहे. दरम्यान शाहरुख आर माधवनसोबतही चित्रपटात काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या आर माधवन ‘रॉकेट्राय : नम्बी इफेक्ट’ या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माधवन या चित्रपटावर काम करत होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनापासून ते कथा लेखनापर्यंतची जबाबदारी स्वत: माधवनने घेतली आहे. आता या चित्रपटासाठी माधवनने शाहरुख खानला विचारले असल्याचे म्हटले जाते. चित्रपटात शाहरुख एका पत्रकाराची भूमीका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक दिग्गजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली आहे. क्रीडाक्षेत्रापासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत अनेक जणांचा जीवनप्रवास बायोपिकच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. यामध्येच आता नम्बी नारायण यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात माधवन पदार्पण करत असल्यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 2:36 pm

Web Title: shahrukh khan to work with r madhavan avb 95
Next Stories
1 ‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध
2 KBC 12: १ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?
3 ‘तारक मेहता..’च्या ‘गोगी’ला गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी; पाहा CCTV फुटेज
Just Now!
X