News Flash

‘तो कुठे आहे…’, वयाच्या ४२व्या वर्षी अभिनेत्री शोधतेय लग्नासाठी मुलगा

तिने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब असणाऱ्या शमिताने ‘ब्लॅक विडोज’ या सीरिजमध्ये काम करत पुनरागमन केले. ४२ वर्षांच्या शमिताने अद्याप लग्न केलेले नाही. आता एका मुलाखतीमध्ये तिने लग्नाबाबत वक्तव्य केले आहे.

शमिताने नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने, ‘मला लग्न करायचे आहे पण माझा नवरा कोण असेल मला ठावूक नाही. तो कुठे आहे मला माहिती नाही आणि मला त्याला शोधावे लागेल. मी माझ्या मनातील गोष्टी इतरांपासून लपवू इच्छित नाही आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. पण प्रेमावर माझा पूर्ण विश्वास आहे’ असे म्हटले.

पुढे ४२ वर्षीय शमिता म्हणाली, ‘जर मला कोणासोबत लग्न करायचे असेल तर मी माझे संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवू इच्छिते. पण अद्याप मी अशा व्यक्तीला भेटले नाही.’

शमिताने २००० साली प्रदर्शित झालेल्या ‘मोहब्बते’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती २००९मध्ये छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो बिग बॉसमध्ये दिसली होती. २०१९मध्ये तिने खतरों के खिलाडी या शोमध्ये सहभाग घेतला होता. शमिता ही एक इंटीरिअर डिझायनर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 3:51 pm

Web Title: shamita shetty spoken about her marriage and life partner avb 95
Next Stories
1 जावेद अख्तर बनवणार राखी सावंतच्या जीवनावर आधारित चित्रपट?
2 अनुराग- तापसीने केली चित्रीकरणाला सुरुवात? अनुरागचं नवं ट्विट चर्चेत
3 ‘डोन्ट टच मी’ म्हणत, जॉनी लिव्हरने केला मुली सोबत डान्स
Just Now!
X