अमुक एकाने तक्रार केली तरच पोलीस त्यात लक्ष देतात असे अजिबात नाही. जिथे अडचण आहे तिथे ते तत्परतेने पोहचतातच. लोकांच्या समस्या सोडवणं हेच त्यांचं मुख्य काम आणि हे काम करत असताना अनेक वेगवेगळ्या गुन्हेगारांशी त्यांचा सामना होतो. काही वेळा गुन्हेगार पटकन सापडतात. तर काही वेळा जंग जंग तपासून सुद्धा समाजात नाही. गुन्हे करणारी व्यक्ती समोरचं असते. पण ती दिसत नाही. अश्यावेळी पोलिसाच्या बुद्धी चातुर्यामुळेही अनेक गुन्हे पकडले जातात. असंच काहीस या आठवड्यातील शौर्य गाथा अभिमानाची च्या कथांमध्ये घडलं.

शुक्रवारी घडणारी कथा म्हणजे एस्टर अनुह्या मर्डर केस मुंबईला जॉब करणारी एस्टर जेव्हा सुट्टीवरून मुंबईला आली तेव्हा ती शेवटची दिसली स्टेशनच्या सी सी टीव्ही फुटेजवर एका अनोळखी व्यक्तीबरोबर. त्यानंतर तिची बॉडी मिळाली. तर सन २०१० मधील शिल्पा मर्डर केस, मध्ये एकता कॉलनीमध्ये राहणारी शिल्पा जाधव अचानक गायब झाली आणि शेवटी तिची बॉडी मिळाली आणि तिच्या खुन्याचा शोध सुरु केला असता संशयाची सुई तिच्या मित्रांपासून तिचे वडील आणि अगदी आजीवर सुद्धा फिरली. या दोन्ही मुलींच्या मर्डर केसाचा थरार आणि पोलिसांची अतुलनीय कामगिरी पाहता येईल शुक्रवारी ३ फेब्रुवारीला एस्टर अनुह्या मर्डर केस आणि शनिवारी ४ फेब्रुवारीला शिल्पा जाधव मर्डर केस रात्री ९ वाजता फक्त झी युवावर.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
Gold and Silver Price Today
Gold-Silver Price on 4 April 2024: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; चांदीही ७९ हजार रुपयांच्या पुढे, पाहा आजचा भाव 
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

हैदराबादची एस्टर अनुह्या केस आणखी गुंतागुंतीची होती. २३ वर्षाची एस्टर सुट्टी संपून मुंबईला परत आली पण घरी पोहचली नाही. ऑफिसमध्ये आली नाही म्हुणुन सुरु झालेल्या चौकशी दरम्यान अनेकविध गोष्टी बाहेर पडू लागल्या. पोलीस अधिकारी पाटील यांनी चौकशी सुरु केली असता पहिला पुरावा मिळाला तो म्हणजे स्टेशन वरील सी सी टीव्ही फुटेज, ज्यात एस्टर एका अनोळखी व्यक्तीबरोबर बाईक वर जात होती. परराज्यातून एक मुलगी येते आणि बेपत्ता होते हि त्यांनतर ११ दिवस पोलिसांच्या काहीच हाताला येत नव्हते. एस्टर जिवंत आहे, मेली आहे काहीच कळायला मार्ग नव्हता. मीडिया मध्येही ह्या केसावरुन पोलिसांची नालस्ती होऊ लागली आणि पोलिसांना एस्टरची बॉडी मिळाली. त्यानंतर मात्र पोलिसांचा शोधाचा वेग वाढला आणि पाटील मुख्य आरोपी पर्यंत पोहोचले. ह्या घटनेतील पोलिसांचे नेटवर्किंग वाखाणण्याजोगे आहे. शनिवार दिनांक ४ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता झी युवावर हि गोष्ट पाहायला मिळेल.

सन २०१० मध्ये एकता कॉलनीमध्ये शिल्पा नावाची १६ वर्षाची मुलगी गायब झाली. स्वभावाने अगदी सोज्वळ आणि प्रेमळ असलेली मुलगी अचानक गायब झाल्याने सर्वच जण टेन्शन मध्ये होते. सर्वप्रथम तिचा शोध घेताना वडील पोलीस तक्रार सारखे टाळत होते, त्यामुळे त्याच कॉलनीमध्ये राहणारा विनोद या मुलाने पोलीस मित्र बनून पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलीस अधिकारी निकम हि केस पाहत होते. त्यांनी शोधकार्य सुरु केल्यावर काहीच दिवसात त्यांना कॉलनीच्या मागील बाजूच्या गोडाऊन मध्ये शिल्पाची बॉडी सापडली. तिचे एक प्रेमप्रकरण होते आणि तो मुलगाही गायब होता. पण हळू हळू अनेक गोष्टी निकम यांनी उकळून काढल्या. प्रथम शिल्पाचा मित्र बंड्या, त्यांनतर तिचे वडील आणि शेवटी शिल्पाची आजी सगळ्यांवर संशय होता. मात्र पोलिसांना असा एक पुरावा मिळाला कि या गुन्ह्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. हा खून कोणी आणि का केला आणि कश्याप्रकारे पोलीस अधिकारी निकम यांनी हि मर्डर केस सोडवली हे पाहण्यासाठी शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारीला शौर्य गाथा अभिमानाची चा एपिसोड झी युवावर पाहा.

या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंटचे सचिन मोहिते, तर लेखन लेखक अभिजीत पेंढारकर यांनी, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.