News Flash

लाइव्ह सेशनमध्ये शहनाजने उगारला सिद्धार्थवर हात, व्हिडीओ व्हायरल

त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बिग बॉस पर्व १३चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल ही सर्वांची आवडती जोडी होती. त्यांनी लाखो लोकांच्या मनात घर केले होते. सध्या त्या दोघांचा इन्स्टाग्राम लाइव्हचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शहनाज मजेशीर अंदाजात सिद्धार्थला मारताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शहनाज आणि सिद्धार्थ मस्तीमध्ये एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दरम्यान शहनाजने मजेशीर अंदाजात सिद्धार्थवर हात उगारला असल्याचे दिसत आहे. सिद्धार्थ काही वेळासाठी एकदम शांत होतो आणि नंतर दोघेही हसू लागतात.

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ शुक्ला आणि नेहा शर्माचा ‘दिल को करार आया’ हा म्यूझिक व्हिडीओ रिलिज होता. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला होता. तर शहनाज टोनी कक्कडच्या ‘कुर्ता पजामा’ या म्यूझिक अल्बमध्ये दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 3:39 pm

Web Title: shehnaaz gill slaps sidharth shukla during instagram live session avb 95
Next Stories
1 ‘साहो’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत अडकला लग्न बंधनात
2 मध्यरात्री शर्टलेस फोटो शेअर करत विकीने व्यक्त केली ही’ इच्छा
3 सोनू सूदच्या साथीदाराला पोलिसांनी मारली होती थोबाडीत; कारण…
Just Now!
X