बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता पाच महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर अभिनेते शेखर सुमन वारंवार प्रतिक्रिया देत होते. त्यांच्या या प्रतिक्रियांमुळे त्यांना ट्रोल देखील केलं गेलं. काही जणांच्या मते त्यांना बिहार निवडणुकीचं तिकिट हवं होतं म्हणून ते प्रयत्न करत होते. मात्र निवडणूक संपताच त्यांनी ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर मराठी कलाकाराची टीका

“सुशांत प्रकरणाच्या निमित्ताने मी तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. त्यावेळी माझ्यावर राजकारण केल्याचा आरोप केला जात होता. माझ्या राजकीय इच्छा पुर्ण करायच्या आहेत म्हणून मी तेजस्वी यादव यांना भेटलो अशी टीका माझ्यावर झाली. पण आता बिहारच्या निवडणूका संपल्या आहेत. आणि मला काहीही फरक पडलेला नाही मी आजही सुशांत प्रकरणावरच बोलतोय. त्यामुळे ट्रोलर्सने आता माझी माफी मागावी.” अशा आशायाचं ट्विट करुन त्यांनी सर्व ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.

अवश्य पाहा – ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पाहायचा का?’; ‘लव्ह जिहाद’च्या कायद्यावर अभिनेता संतापला

अवश्य पाहा – साडीमध्ये खुललं अमृताचं सौंदर्य; पाहा अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर सुशांत प्रकरणाची चौकशी आता बंद होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु ही शक्यता सीबीआयने फेटाळून लावली आहे. सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत प्रकरणाची चौकशी सुरुच राहील.