News Flash

म्हणून फोटोग्राफरवर भडकली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ व्हायरल

सध्या तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

(Photo Credit : Voompla video)

देशात करोना महामारीचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही करोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कलाकरांनादेखीन करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. अशातच सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती फोटोग्राफरवर भडकली असल्याचे दिसत आहे.

‘वूम्प्ला’ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा फोटोग्राफरशी बोलताना दिसत आहे. ‘सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करा. तुम्ही मास्क का लावले नाही. तुझे मास्क कुठे आहे?’ असे रागात शिल्पा बोलताना दिसत आहे. सध्या शिल्पाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

शिल्पा शेट्टी लवकरच ‘हंगामा २’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ती अभिनेते परेश रावल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच तिचा ‘निकम्मा’ हा देखील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलागा अभिमन्यु दसानीसोबत दिसणार आहे. शिल्पा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती पती राज कुंद्रासोबतचे व्हिडीओ सतत शेअर करत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 3:40 pm

Web Title: shilpa shetty angry on photographers for not wearing mask avb 95
Next Stories
1 सोनू सूद म्हणतोय, “ही वेब सीरिज नक्की पाहा”
2 ‘डॉक्टर डॉन’च्या सेटवर श्वेता शिंदे मिस करते या व्यक्तीला
3 Ctrl C + Ctrl V : संजय दत्तचा लूक छापल्याचा फोटो होतोय व्हायरल
Just Now!
X