20 October 2020

News Flash

12 वर्षांनी शिल्पा शेट्टीचं कमबॅक, साकारणार ही भूमिका

शिल्पा शेट्टीने २००७मध्ये 'अपने' चित्रपटात भूमिका साकारली होती

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता दिलजीत दोसांज आणि अभिनेत्री यामी गौतम एक नवा कॉमेडी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे म्हटले जात आहे. या चित्रपटाची घोषणा करताना चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश तौरानी यांनी या चित्रपटात आणखी एक कलाकार महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले आहे. परंतु या चित्रपटाचे नाव आद्याप समोर आलेले नाही.

आता या चित्रपटात गेल्या १२ वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची निवड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज मिर्जा यांचा मुलगा दिग्दर्शित करणार  आहे. तसेच या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. या आधी त्याने ‘पहेली’, ‘यस बॉस’ आणि ‘राजू बन गया जेंटलमॅन’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

शिल्पा शेट्टीने २००७मध्ये ‘अपने’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात धर्मेंद्र, बॉबी देओल, सनी देओल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ती पाहूण्या कलकाराच्या भूमिकेत ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील टायटल ट्रॅक, दोस्तानामधील ‘शट आप अॅन्ड बाऊन्स’ गाणे आणि २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तू मेरे टाईप का नही है’ या गाण्यात झळकली होती.

शिल्पा तिच्या आगामी चित्रपटात एका लेखिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या शिल्पा लंडन आणि ग्रीसमध्ये सुट्यांचा आनंद लुटत आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात ती मुंबईला परतणार असून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाबाबत शिल्पा फार उत्साही असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2019 12:21 pm

Web Title: shilpa shetty coming back in new movie avb 95
Next Stories
1 ‘ससुराल सिमर का’ मालिकेतील बालकलाकाराचा अपघाती मृत्यू
2 ”बिग बॉस’च्या घरात सेक्सशिवाय १०० दिवस कशी राहशील?’
3 Video : ‘मी असा लढलो’, शरद पोंक्षेंनी उलगडली कर्करोगासोबतची झुंज
Just Now!
X