01 March 2021

News Flash

सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करणं शिल्पाला पडलं महागात

'बाजीगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यावेळी नेटक-यांच्या ट्रोलचा विषय ठरली आहे.

शिल्पा शेट्टी

अनेक वेळा चुकीच्या कारणामुळे बॉलिवू़ड सेलिब्रेटींवर ट्रोल होण्याची वेळ येत. अशीच वेळ एका बॉलिवूड अभिनेत्रीवर आली आहे. ‘बाजीगर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यावेळी नेटक-यांच्या ट्रोलचा विषय ठरली आहे.

शिल्पा मालदीव दौ-यावर असताना या ट्रीपचे प्रत्येक अपडेट ती आपल्या चाहत्यांना देताना दिसून येते आहे. याच अपडेटच्या नादात ती चांगलीच ट्रोल झाली आहे. शिल्पाने या ट्रीपमध्ये एक माशाबरोबरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती हुकाला लागलेल्या माशाबरोबर खेळताना दिसते. हा व्हिडिओ पाहताच नेटक-यांनी तिच्यावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.

मासे पकडणे हे सोपं काम नाही, असं कॅप्शन देत शिल्पाने हा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ पोस्ट होताच त्याच्यावर नेटक-यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली. ‘शिल्पा ‘पेटा’ या संस्थेची सदिच्छादूत असून तिच्याकडून या वर्तनाची अपेक्षा नव्हती. एका मुक्या प्राण्याला असा त्रास देणे शोभत नाही. तसेच शिल्पा एक ढोंगी आहे, ‘ असे एका ट्रोलरने शिल्पाला सुनावले आहे.

‘नेटक-यांचा रोष बघून शिल्पाने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असून मी शाकाहारी आहे. त्यामुळे मी हा मासा खाण्यासाठी पकडला नव्हता. तसेच तो मी काही काळातच सोडून दिला. त्या माशाला कोणतीही इजा झालेली नाही’, असेही शिल्पाने यावेळी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 6:03 pm

Web Title: shilpa shetty get trolled for torturing a fish
Next Stories
1 Video: अॅक्शन स्टार जॅकी चेनच्या मुलीवर पुलाखाली राहण्याची वेळ
2 प्राण्यांसाठी अनुष्का झाली ‘परी’, वाढदिवसानिमित्त सुरु केलंय अॅनिमल शेल्टर
3 प्रदर्शनापूर्वीच रजनीकांत यांच्या ‘काला’ने गाठली ‘ही’ उंची
Just Now!
X