26 January 2021

News Flash

Video: शिल्पा शेट्टीचा अनोखा अंदाज, राज कुंद्राने शेअर केला व्हिडीओ

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते दोघे ही सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यांचे व्हिडीओ सतत चर्चेत असतात. आता राज कुंद्राने शिल्पाचा एक नवा व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ चर्चेत आहे.

राज कुंद्राने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘जर मी पंजाबमधील एखाद्या गावातील मुलीशी लग्न केले असते तर ती अशी दिसत असती’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

राज कुंद्राने शेअर केलल्या व्हिडीओमध्ये शिल्पा अनोख्या अंदाजात दिसत आहे. हा व्हिडीओ फेस फिल्टरने बनवण्यात आला असून यामध्ये शिल्पा पंजाबी मुलगी वाटत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘लाँग-लाची’ हे गाणे सुरु आहे. राजच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

यापूर्वी राज कुंद्राचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये राज गाणे गाताना दिसत होता आणि त्याची मुलगी समिषा ते कॉपी करताना दिसत होती. त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 7:21 pm

Web Title: shilpa shetty gets a punjabi girl makeover in husband raj kundra new video avb 95
Next Stories
1 अशी झाली सई आणि आणि नचिकेतच्या आईची भेट
2 रोनित रॉय व रिचा चड्ढाच्या ‘कँडी’ची उत्सुकता
3 ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्रीच्या घरात ‘या’ नवीन सदस्याचे आगमन
Just Now!
X