News Flash

लंडनमधील उपहारगृहात शिल्पा शेट्टीच्या नावाने ‘एसएसके स्पेशल’ डिश!

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हे नाव लंडनमध्येदेखील चांगलेच परिचयाचे आहे.

शिल्पा शेट्टी

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हे नाव लंडनमध्येदेखील चांगलेच परिचयाचे आहे. ब्रिटिश रिअॅलिटी शो बिग ब्रदरची विजेता असलेल्या शिल्पाचे लंडनमध्ये मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. बिग ब्रदर शो जिंकल्यापासून अभिनेत्री तथा व्यावसायिक असलेल्या शिल्पाची लोकप्रियता दिवसागणिक वृद्धींगत होताना दिसत आहे. अलीकडेच ती लंडनला गेली होती. तिथे आपल्या कुटुंबियांसह तिने एका भारतीय उपहारगृहात भोजनाचा आनंद लुटला. त्यावेळी उपहारगृहाच्या मालकाने शिल्पाला भेटून हेल्थ आणि वेलनेस या तिच्या पुस्तकासाठी तिला शुभेच्छा दिल्या. ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शिल्पाला उपहारगृहाचे किचन पाहण्यासाठी नेले. जेणेकरून शिल्पा उपहारगृहाच्या हेड शेफला तिची आवडती डिश तयार करायला शिकवेल. शिल्पानेदेखील शेफला आनंदाने ट्रॅडीशनल साउथ इंडियन स्टाइल रोस्टेड चिकन डिश शिकवली. आता ही डिश उपहारगृहाच्या मेनूमध्ये ‘एसएसके स्पेशल’ नावाने सामील झाली आहे.

शिल्पाचे फिटनेस वेड सर्वश्रुत आहे. ती केवळ स्वत:च्या फिटनेसबद्दल सजग नसून, इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला देते. यासाठी तिने स्वतःची योगासनांची सीडीदेखील बाजारात आणली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी तिने महिलांच्या फिटनेससाठी खास पुस्तकाचे प्रकाशनदेखील केले. या पुस्तकाचे नाव आहे ‘द ग्रेट इंडियन डाएट’ असून, पुस्तकात तिने सकस आहाराचे महत्व पटवून दिले आहे. दिसायला सुंदर असलेली शिल्पा स्वत:च्या आरोग्याची आणि फिटनेसचीदेखील तेवढीच काळजी घेते.

‘द ग्रेट इंडियन डाएट’ हे आपले पुस्तक शिल्पाने न्यूट्रिशिअनिस्ट, वक्ता आणि एक्सरसाइज फीजिओलॉजिस्ट ल्यूक कोहिन्टोसोबत लिहिले आहे. वजन कमी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वांना आपले हे पुस्तक योग्य मार्गदर्शन करणार असल्याचे पुस्तक प्रकाशनावेळी शिल्पा म्हणाली होती.

गंमत म्हणजे शिल्पाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, ट्रॅफिक सिग्नलवर पुस्तक विकणारी एक व्यक्ती शिल्पालाच तिचे ‘द ग्रेट इंडियन डाएट’ पुस्तक विकत असल्याचे या फोटोमध्ये दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 4:15 pm

Web Title: shilpa shetty has a special dish named after her in one of london restaurant
Next Stories
1 ‘टॉयलेट एक प्रेम कथा’च्या दिग्दर्शकाची जीभ छाटणा-यास १ कोटीचे बक्षीस
2 पाहा: ..अशा प्रकारे शाहरुखने केला अब्रामचा बचाव
3 ‘नीरजा’च्या कुटुंबियांच्या वतीने सोनमने स्वीकारला हा पुरस्कार
Just Now!
X