News Flash

मराठी मालिकेच्या शीर्षकगीतावर शिल्पाचा टिक-टॉक अंदाज, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर असल्याचे दिसत आहे

सध्या टिक-टॉक या अॅपने सर्वांना वेड लावले आहे. या यादीमध्ये सर्व सामान्यांपासूने ते लोकप्रिय कलाकारांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. अनेकजण आपले भन्नाट टिक-टॉक व्हिडीओ शेअर करताना दिसतात. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी. ती आजकाल बऱ्याचदा टिक-टॉक व्हिडीओ शेअर करताना दिसते. पण तिने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ थोडा खास आहे.

या व्हिडीओमध्ये ती मराठी मालिकेच्या शीर्षकगीतावर अदाकरी सादर करताना दिसत आहे. हे शीर्षकगीत झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेचे आहे. ‘नको चंद्र तारे…’ असे या शीर्षकगीताचे बोल असून शिल्पाच्या हावभावांनी ते पाहायला प्रेक्षकांना आवडत आहे.

@theshilpashettyTumcha saathi, mi Marathi… kasha vaatle haav bhaav??? ##Marathi ##marathimulgi ##betweenshots ##fyp♬ original sound – Zee Marathi Official

शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करत मराठीमध्ये कॅप्शन दिले आहे. ‘तुमच्यासाठी, मी मराठी… कसे वाटले हावभाव?’ असे तिने म्हटले आहे. हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरल्याचे दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला ७५ हजाराहून अधिक लाईक्स आहेत.

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने ५० दिवसांत कमावले १ कोटी; वाचा कसं?

माझा होशिल ना ही मालिका काही दिवसांपूर्वीच सुरु झाली. या मालिकेसह तिचे शीर्षकगीतही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे आर्या आंबेकरने गायले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 1:41 pm

Web Title: shilpa shetty shares marathi serial majha hoshil na title song tik tok version avb 95
Next Stories
1 ..म्हणून आजवर करिश्मासोबत केलं नाही काम- करीना कपूर खान
2 ‘सावत्र आई’ होण्याच्या टॅगवर करीनानं सोडलं मौन, म्हणाली…
3 पायल रोहतगीच्या वडिलांचे येस बँकेत अडकले कोट्यवधी रुपये; मागितली पंतप्रधानांकडे मदत
Just Now!
X