News Flash

Video: शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं स्वागत; दरवर्षीप्रमाणे ‘लालबागचा राजा’ची प्रतिकृती होणार विराजमान

दरवर्षी शिल्पा मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करताना दिसते.

ShilpaShetty
(Photo: Varinder Chawla/Indian Express)

गणपत्ती बाप्पाचं आगमन म्हंटलं की सर्वत्र उत्साहाच आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं. घरोघरी बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जाते. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी देखील गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील शिल्पाच्या घरी लालबागच्या राजाची प्रतिकृती विराजमान होणार आहे.

नुकतच शिल्पा शेट्टीला गणेशमूर्ती कला केंद्रा बाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. दरवर्षी शिल्पा मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करताना दिसते. पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने पुन्हा एकदा सर्व कामांना सुरुवात केली आहे. अशात गणपती बाप्पाला घरी घेऊन जात असतानाही शिल्पाच्या चेहऱ्यावर तिने दु:ख झळकू दिलेलं नाही. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पाचा हा व्हिडीओ शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

हे देखील वाचा: ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात वेडी होती अभिनेत्री मृणाल ठाकूर

शिल्पाच्या घरी दीड दिवस गणपती उत्सव साजरा केला जातो. शिल्पा शेट्टीने पुन्हा एकदा तिच्या दैनंदिन कामाची सुरुवात केली आहे. तसचं ती सोशल मीडियावर देखील पुन्हा सक्रिय झाली आहे. या कठीण काळात तणाव दूर करण्यासाठी आणि सकारात्मकतेसाठी ती योगा करत असून ती सोशल मीडियावर योगाचे व्हिडीओ शेअर करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 4:13 pm

Web Title: shilpa shetty welcome lord ganesh at hoem kpw 89
Next Stories
1 मालिकांमध्ये होणार गणेशोत्सवाचा जल्लोष
2 ‘इंडियन आयडल मराठी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 Bigg Boss OTT- दिव्याचा गेमप्लॅन पाहून शमिता शेट्टीला फुटला घाम; राकेश म्हणाला…
Just Now!
X