साडी आणि गावरान भाषा यांमुळे लोकांना आवडणारी ‘अंगुरी भाभी’ म्हणजे शिल्पा शिंदेने ऋषी कपूर आणि वीर दास बरोबर एक आयटम साँग केले. नुकतेच या गाण्याटे शुटिंग पूर्ण झाले. या आयटम साँगमध्ये शिल्पा वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळत आहे. हे गाणे पंजाबी लग्नाच्या प्रसंगावर चित्रित केले गेले आहे. या सिनेमात ऋषी कपूर, वीर दास, परेश रावल आणि पायल घोष हे कलाकार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शक संजय चहल आहेत. संजय चहलने याआधी उर्मिला मातोंडकर आणि संजय दत्त यांना घेऊन खूबसुरत हा सिनेमा केला होता.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय चहल म्हणाले की, ‘हा सिनेमा एक दोन वेगवेगळ्या संस्कृती एकत्र आल्यावर होणाऱ्या विनोदावर आधारीत आहे. यात ऋषी कपूर पंजाबी व्यक्तिरेखा साकारणार आहेत तर परेश रावल गुजराती व्यक्तिरेखा साकारणार आहेत.’
शिल्पाबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘शिल्पा या गाण्यासाठी योग्य आहे. तिची लोकप्रियताही चांगलीच आहे. ती एक पाश्चात्य मुलगी आणि संस्कारी मुलगी या दोन व्यक्तिरेखा एकाचवेळी चांगल्या प्रकारे निभावू शकते.’ या गाण्याबद्दल शिल्पाने सांगितले की, ‘सिनेमाचे शेवटचे शेड्युल सुरु होते आणि ही संधी मला सोडायची नव्हती. ऋषी कपूर यांना माहित होतं की मी मालिका सोडते आहे. त्यावर त्यांनी चालत्या गाडीतून न उतरण्याचा सल्ला दिला. पण आग लागली होती म्हणून धावत्या गाडीतून उतरावे लागले असेही सांगितले. तर परेश रावल यांची पत्नीदेखील माझी मालिका बघतात,’ असे ते म्हणाले.

Shilpa-Shinde