काही दिवसांपूर्वी हिंदी बिग बॉस पर्व १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला झाला. घरातील तसेच घराबाहेरील वादांमुळे सध्या तो चर्चेत आहे. सिद्धार्थवर ‘बिग बॉस ११’ची विजेती शिल्पा शिंदेने गंभीर आरोप केले होते. सिद्धार्थ माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्याने अनेकदा मला मारहाणसुद्धा केल्याचा आरोप शिल्पाने केला होता. यासंबंधी सिद्धार्थला प्रश्न विचारल्यास त्याने टाळाटाळ केली होती. आता शिल्पाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती सिद्धार्थला हिंमत असेल तर समोर ये अशी धमकी देत असल्याचे दिसत आहे.
‘सिद्धार्थ शुक्ला जर तुला माहित नसेल तर तु तुझ्या पीआर कंपनीला इन्फॉर्म कर, कारण मी खोटं बोलते आहे असे त्यांचे म्हणणे आहे. जर मी खोट बोलते असे सतत ऐकू येत राहिले तर मला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावे आहेत. जी क्लिप माझ्याकडे आहे ती माझ्या आयुष्याचा केवळ ५ ते १० टक्के भाग आहे. सर्वांना माझा अनुभव आहे त्यामुळे मला वेगळे सांगायची गरज नाही’ असे शिल्पा म्हणली.
‘मला बोलायला लावू नकोस, कारण माझ्याकडे बिल्डिंगमधला सीसीटीवी फुटेज आहे. माझ्यासाठी तु फोनवर कोणाला धमकी दिलीस आणि शिवीगाळ केलीस हे देखील माझ्याकडे आहे. तु तूझी काळजी घे. मला बोलायला भाग पाडू नकोस’ असे पुढे शिल्पा म्हणाली आहे.