01 December 2020

News Flash

‘मेरे साई’ मालिकेत झळकणार अभिनेत्री शिल्पा तुळसकर

'मेरे साई- श्रद्धा और सबुरी' या मालिकेतील पुढील भागात अभिनेत्री शिल्पा तुळसकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

अभिनेत्री शिल्पा तुळसकर

‘मेरे साई- श्रद्धा और सबुरी’ या मालिकेतील पुढील भागात अभिनेत्री शिल्पा तुळसकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे आणि अनेक लोक श्रद्धेने ही मालिका पाहतात. मालिकेतील आगामी गोष्ट ही साई चरित्रातील एक मोठी गोष्ट आहे. साईंच्या अटकेची कथा आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

याविषयी शिल्पा तुळसकर म्हणाल्या, “फेब्रुवारीत मी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत शिर्डीला गेले होते आणि मार्चपासून मी दर गुरुवारी साई चरित्र वाचू लागले. मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की त्यानंतर सात महिन्यांनी लॉकडाउननंतर मी मेरे साई मालिकेतून पुन्हा काम सुरू करते आहे. मी १७ वर्षांची असल्यापासून तुषार दळवीला ओळखते आणि आता पुन्हा त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”

आणखी वाचा : अभिनेत्याच्या आजारपणामुळे चमकलं सलमानचं नशिब; आज ‘भाईजान’ धावून आला त्याच्या मदतीला 

मालिकेतील यापुढचे कथानक खूप महत्त्वाचे आणि मनाला व्यथित करणारे आहे. पोलिसांनी द्वारकामाई येथे साईंना अटक केली होती, ती गोष्ट यात आहे. या कथेत शिल्पा तुळसकर वसुंधरा ही भूमिका साकारणार आहे. साईंवरील तिच्या नितांत भक्तीमुळे चमत्कार घडताना ती पाहते आणि त्यामुळे तिला स्वतःच्या जीवनातील समस्यांशी लढण्याचे बळ मिळते. वसुंधराची ही गोष्ट सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई- श्रद्धा और सबुरी मालिकेत रात्री ७ वाजता पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 2:28 pm

Web Title: shilpa tulaskar in mere sai serial ssv 92
Next Stories
1 कातिलाना अदा! पलक तिवारीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा
2 “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल
3 अशी सुरू झाली माधुरी दीक्षित- श्रीराम नेने यांची प्रेमकहाणी
Just Now!
X