बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. दोघे सतत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसतात. नुकतात शिल्पाचा पती राज कुंद्राने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने अभिनेता रणवीर सिंहला कॉपी केल्याचे दिसत आहे.

राजने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने रिफेस अॅपचा वापर करुन रणवीर सिंहच्या जागी स्वत:चा चेहरा लावला आहे. राज व्हिडीओमध्ये रामलीला चित्रपटातील ‘ततड़-ततड़’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

My Abs are coming out nicely what say @ranveersingh some mid week masti #rajfuntra

A post shared by Raj Kundra (@rajkundra9) on

हा व्हिडीओ शेअर करत राज कुंद्राने मजेशीर कॅप्शन दिले आहे. ‘माझे अॅब्ज छान दिसत आहेत. रणवीर सिंह तुझे काय म्हणणे आहे’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे. या फोटोवर शिल्पा शेट्टीने कमेंट करत ‘हे ते अॅब्ज नाहीत जे मी म्हटले होते’ असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर राज कुंद्राचा हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.