बिग बॉसच्या घरात सध्या अनेक बदल पाहायला मिळत आहेत. काही सदस्य घराबाहेर पडले. तर त्यांची कमतरता दूर करण्यासाठी नव्या सदस्यांचा प्रवेश झाला आहे. दरम्यान अनेक सदस्यांची गुपिते देखील समोर आली आहे. वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या क्लिपमध्ये घरातील सदस्य शिव ठाकरेने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा केला आहे.

हिना पांचाळ आणि शिव ठाकरे या दोघांमध्ये संभाषण सुरू होते. ते दोघे सलमान आणि करिश्माच्या ‘दुल्‍हन हम ले जायेंगे’ चित्रपटातील गाणे ‘रुठना मनाना है प्‍यार की अदा, कैसे जियूंगा मै तुझसे होके जुदा’ हे गाणे गात असतात. गाण गात असताना शिवला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची आठवण येते. ‘हे गाणे मला फार आवडते. मी माझ्या एक्स गर्लफ्रेंडचा राग घालवण्यासाठी हे गाणे गायचो. तिलाही हे गाणे फार आवडायचे. ती जर आज मला पाहात असेल तर तिला वाईट वाटत असेल. ती खूप छान होती’ असे शिव म्हणाला.

‘आम्ही दोघे नऊ वर्षे रिलेशनशीपमध्ये होतो. नंतर माझ्या चुकीमुळे आम्ही वेगळे झाले’ असे शिव पुढे म्हणाला. त्यानंतर हिनाने शिवला ‘तुमचं ब्रेकअप का झालं? काय केलस तू?’ असे प्रश्न विचारले. त्यावर शिवने ती माझी खूप काळजी घ्यायची, मला काय आवडतं काय नाही हे तिला माहित होतं. पण माझीच चूक होती. मी तिला लग्नाची कमिटमेंट दिली नव्हती आणि तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली होती. माझ्यासाठी माझे करिअर फार महत्वाचे होते. त्यामुळे आम्ही दोघे वेगळे झालो’ असा खुलासा केला.

हिनाने नंतर त्‍याला समजवायचा प्रयत्‍न केला की, त्‍यांनी त्यांच्या नात्‍याला आणखी एक संधी द्यायला हवी. पण शिवने त्‍याची एक्‍स आता तिच्‍या आयुष्‍यात पुढे गेली असल्याचे सांगितले. शिवची ही गर्लफ्रेंड कोण होती? अशी उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.