‘बिग बॉस मराठी २’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अंतिम फेरीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. १०० दिवस मोबाइल, कुटुंबीयांपासून दूर राहिलेल्या स्पर्धकांमध्ये आता फिनालेची धाकधूक दिसून येत आहे. वूटवरील अनसीन अनदेखाच्या नवीन क्लिपमध्ये घरातील मंडळी शो संपल्यानंतर त्यांच्या जीवनाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.

शिव विचारतो, ”एक महिना तरी लागेलच आपल्‍याला सेट व्‍हायला.” स्‍वयंपाकामध्‍ये व्‍यस्‍त असलेली वीणा म्‍हणते, ”मला नाही वाटतं, आता आपण बाहेर पडल्यावर गणेशोत्सव सुरू होणार आहे आणि त्यानंतर लगेच नवरात्र आहे. पण शिव लगेच स्‍पष्‍ट करतो की, तो खाण्‍या-पिण्याच्‍या सवयींमधील बदलांबाबत बोलत आहे.

किशोरीताई म्‍हणतात, ”मला वाटत नाही की फार त्रास होईल.” शिव त्‍याच्‍या मनातील विचार व्‍यक्‍त करत म्‍हणतो, ”पुन्‍हा ते शेड्युल चालू होईल. इथून गेल्‍यावरच १०-१२ फोन येतील. तीन महिने मोबाइल जवळ नाही आणि अचानक हे सगळं सुरू होईल.”

वीणा म्‍हणते, ”फोन बाजूला ठेवून कुटुंबीयांना वेळ देऊ असं मला वाटतं.” किशोरीताई म्‍हणतात, ”आपण एकमेकांना फोन नाही करणार.” यावर वीणा त्‍वरित बोलते, ”मी करीन सगळ्यांना कॉल ९.३०ला.”

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्‍यानंतरही हे स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात राहतील का हे तर येत्या काळातच कळेल. पण सध्या या सिझनचा विजेता कोण ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.