News Flash

‘हाफ गर्लफ्रेंड’ श्रद्धाच्या आयुष्यातील एक हिस्साच

मी स्वत: देखील कुणाची तरी ‘हाफ गर्लफ्रेंड’ म्हणून जगले आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर

बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर ‘हाफ गर्लफ्रेंड’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धाने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयुष्यातील प्रेमाचा किस्सा शेअर केला. श्रद्धा म्हणाली की, ‘अनेकांच्या आयुष्यात प्रेम येते पण काही कारणास्तव प्रेम वचनात बांधता येत नाही. यामध्ये कामाचे स्वरुप असेल अथवा समाजातील जातीवाद असेल अशी अनेक कारणे असू शकतात. महाविद्यालयात असताना मी स्वत: देखील कुणाची तरी ‘हाफ गर्लफ्रेंड’ म्हणून जगले आहे. एवढेच नाही तर माझ्या मित्र मैत्रींणीसोबतही असे प्रकार घडल्याचे पाहायाला मिळाले.’ यावेळी श्रद्धाने शाळेतील प्रेमाचा किस्सा देखील सांगितला. शाळेतील प्रेमाविषयी श्रद्धा म्हणाली की, ‘शाळेत असताना मला एक मुलगा खूप आवडायचा. पण, त्याला माझ्यात अजिबात रस नव्हता. मला नेहमी वाटते की, मित्र आणि गर्लफ्रेण्ड यांच्यासारखेच हाफगर्लफ्रेण्ड हे देखील एक नातेच आहे.

लेखक चेतन भगतच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ पुस्तकावर आधारित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील श्रद्धा आणि अर्जुनच्या जोडीला चांगलीच पसंती मिळताना दिसते. अर्जुनसोबतच्या केमिस्ट्रीचे संपूर्ण श्रेय श्रद्धाने चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरीला दिले. दिग्दर्शकाबद्दल ती म्हणाली की, मोहित सुरी कमालीची केमिस्ट्री जुळवून आणतात. यासाठी तिने मोहित सुरींसोबतच्या चित्रपटाचे दाखले दिले. श्रद्धाने ‘आशिकी २’ मध्ये आदित्यसोबत, ‘एक व्हिलेन’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत आणि आता अर्जुनसोबत काम केले आहे.

‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटातील पोस्टरसह ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादामुळे श्रद्धाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. यापूर्वी श्रद्धाचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे मेच्या १९ तारखेला प्रेम, रोमान्स आणि त्यानंतरच्या दुराव्याच्या कहाणीला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत तयार करण्यात आलेला हा चित्रपट यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतिक्षित चित्रपटापैकी एक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 10:47 pm

Web Title: shraddha kapoor half girlfriend in real life
Next Stories
1 विद्या रणबीरसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार
2 आमिर तब्बल १६ वर्षानंतर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार
3 Video: कपिल-सुनीलला एकत्र आणण्यासाठी सिद्धूपाजींनी घातली साद
Just Now!
X