16 February 2019

News Flash

#Stree : मुंबईच्या बसमध्येही ‘स्त्री’च राज्य

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ सहा दिवसांत ५० कोटींची कमाई केली आहे.

श्रद्धा कपूर

भय आणि विनोद यांचं अफलातून समीकरण असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची लोकप्रियता केवळ चित्रपटगृहामध्येच नाही तर मुंबईच्या स्थानिक बसमध्येही पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ सहा दिवसांत ५० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची १०० कोटींच्या दिशेनं वाटचाल सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु असून काही बसमध्ये या चित्रपटाचं पोस्टर, फोटो पाहायला मिळत आहेत.

मुंबईमधील एका बसमध्ये स्त्रियांसाठी राखीव असलेल्या जागेवर ‘स्त्री’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा कपूरचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे ही जागा केवळ स्त्रियांसाठीच असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे स्त्रियासाठी राखीव असलेली जागा दाखविण्यासाठी श्रद्धाच्या फोटोचा वापर करण्यात आल्यामुळे तिच्या लोकप्रियतेत किती वाढ झाली आहे हे एकंदरीत दिसून येत आहे.

दरम्यान, या चित्रपटानं पहिल्याच दिवशी ६.८२ कोटी रुपयांची कमाई केली. सहा दिवसांत या चित्रपटानं अनपेक्षितरित्या ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता पाहता या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये श्रद्धाने केलेल्या अभिनयामुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

First Published on September 6, 2018 5:43 pm

Web Title: shraddha kapoor starrer movie stree poster on mumbai local bus