News Flash

पहिल्यांदाच अॅक्शन वेब सीरिजमध्ये झळकणार श्रिया पिळगावकर

येत्या २३ सप्टेंबर रोजी ही सीरिज प्रदर्शित होत आहे.

सचिन पिळगावकर व सुप्रिया यांची मुलगी श्रिया पिळगावकरने शाहरुख खानच्या ‘फॅन’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजने तिला एक वेगळीच ओळख दिली. आता श्रिया पहिल्यांदाच एका अॅक्शन वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. ‘क्रॅकडाऊन’ असं या सीरिजचं नाव आहे. या सीरिजची शूटिंग लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वीच पूर्ण झाली होती.

अपूर्व लखिया दिग्दर्शित ही एक अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज आहे. यामध्ये श्रियासोबत साकिब सलीमची मुख्य भूमिका आहे. या सीरिजसाठी श्रियाने जवळपास दोन महिने हँड टू हँड फायटिंगचं प्रशिक्षण घेतलं आहे. ही सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये श्रिया आणि साकिबसोबतच इक्बाल खान, वलुचा, राजेश तेलंग आणि अंकुर भाटिया यांच्याही भूमिका आहेत. येत्या २३ सप्टेंबर रोजी ही सीरिज प्रदर्शित होत आहे.

श्रियाने २०१३ मध्ये ‘एकुलती एक’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. तर २०१६ साली तिने ‘फॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘मिर्झापूर’ या सीरिजमधील तिच्या कामाची खूप प्रशंसा करण्यात आली. तिने काही म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 6:52 pm

Web Title: shriya pilgaonkar first action venture crackdown ssv 92
Next Stories
1 गलत गलत गलत है!! कंगनाच्या कार्यालयावर हातोडा, अनुपम खेर म्हणाले…
2 “अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होता?”; BMCच्या कारवाईवर दिया मिर्झा संतापली
3 … म्हणून कुशल बद्रिकेने केलं वैभव मांगलेंचं कौतुक
Just Now!
X