29 September 2020

News Flash

‘या’ परिस्थितीमध्येही सुबोधने दिला चित्रपटाला न्याय

हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटासाठी सुबोध-श्रुतीने प्रचंड मेहनत घेतली आहे. याच चित्रीकरणामधील काही अनुभव नुकतेच शेअर करण्यात आले आहेत.

‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटातील एका गाण्याचं चित्रीकरण दुबईमध्ये चित्रीत करण्यात आलं असून हे गाणं चित्रीत होत असताना सुबोधला प्रचंड दातदुखीचा त्रास जाणवू लागला होता. मात्र तरीही त्याने याकडे दुर्लक्ष करत चित्रीकरण पूर्ण केल्याचं समोर आलं आहे.

दातदुखीने त्रस्त झालेल्या सुबोधने दुबईतील एका दंतचिकित्सकाकडे उपचार घेतले होते. मात्र तरीदेखील त्याचा त्रास कमी होत नव्हता. परंतु चित्रीकरणाचं वेळापत्रक विस्कळीत होऊ नये यासाठी त्याने चित्रीकरण सुरु ठेवलं. विशेष म्हणजे प्रचंड त्रास होत असतानादेखील त्याने हा त्रास चेहऱ्यावर जाणवू दिला नाही. त्यामुळे चित्रपटाचं चित्रीकरण वेळात पूर्ण होऊ शकलं.

हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून तब्बल दोन वर्षानंतर सुबोध-श्रुतीची जोडी एकत्र येणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी ‘शुभ लग्न सावधान’ हा चित्रपट खूप खास ठरणार आहे, हे निश्चित !

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 5:01 pm

Web Title: shubh lagna savdhan subodh bhave
Next Stories
1 बिग बॉसमध्ये जाण्यासाठी तनुश्री दत्ता बेताल वक्तव्ये करत आहेत-मनसे
2 ..म्हणून केदार शिंदे कधीच नट होणार नाही
3 ‘दोस्ताना’च्या सिक्वलमध्ये राजकुमार रावची वर्णी ?
Just Now!
X