24 October 2020

News Flash

Video : ‘शुभ लग्न सावधान’चा ट्रेलर प्रदर्शित

समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित हा चित्रपट १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

एखाद्या कुटुंबामध्ये लग्न असलं की साऱ्या घरात अगदी उत्सवाच वातावरण निर्माण झालं असत. त्यामुळे लग्न म्हटलं की लगीन घाई ही आलीच।. मग लग्नात होणारे रुसवेफुगवे हे सारं आपोआप आलाच. मात्र तरी देखील लग्नातील मज्जा काही निराळीच असते. अशाच एका लग्नाची कथा सांगणारा ‘शुभ लग्न सावधान’ हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

लग्नसंस्थेवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर ‘लग्न’ या विषयावर फिरत असून लग्नाबद्दलची लोकांची विविध मतमतांतरेदेखील यात दाखविण्यात आली आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच एका ख्रिश्चन धर्मीय लग्न दाखविण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच लग्नापासून दूर पळत असलेल्या नायकाची प्रेमाबद्दलची परिभाषादेखील यात पाहायला मिळते. विशेष म्हणजे यात प्रेक्षकांच मनोरंजन होईल ह्याकडे विशेष लक्ष देण्यात आला आहे.

दरम्यान, समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित हा चित्रपट १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून पल्लवी जोशीने ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठे याच्या उपस्थितीत पार पडलेल्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात चक्क एका लग्नसोहल्याच माहोल तयार करण्यात आला होता. त्यामुळे एकदंरीत चित्रपटाच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतल्याच दिसून येत आहे. याचकारणास्तव हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरतो का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 9:12 am

Web Title: shubh lagna savdhan trailer launch
Next Stories
1 #Happy Birthday Kareena : सैफ अली खानच्या आधी करिनाच्या आयुष्यात होता ‘हा’ खान!
2 सुपरस्टार ते देवाशप्पथ
3 Video : अनुप जलोटा-जस्लीनच्या नात्यावर राखी म्हणते….
Just Now!
X