सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मोहन गोखले यांचा आज स्मृतीदिन. ‘श्वेतांबरा’ या मालिकेने मोहन यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. ‘मिस्टर योगी’ मालिकेपासून घराघरात पोहोचलेले मोहन गोखले यांनी ‘हिरो हिरालाल’,’ मोहन जोशी हाजीर हो’ या सारख्या अनेक सिनेमांत अजरामर भूमिका साकारल्या होत्या. आज त्यांच्या आठवणीत त्यांची मुलगी सखी गोखलेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडील मोहन गोखले यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सखीच्या बालपणीचा असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘गेल्या २२ वर्षांमध्ये मी अनेक ठिकाणी फिरले, अनेक लोकांना भेटले, तुम्ही लिहून ठेवलेली पुस्तके वाचली, तुमचे कपडे घातले आणि त्यानंतर मी विचार केला की या गोष्टी तुम्हाला देखील आवडत होत्या का? आणि कधीतरी मला असं वाटतं की निदान सध्या आपण ज्या कठिण परिस्थितीमध्ये जगतोय त्याचा अनुभव घ्यायला तुम्ही नाहीत. सर्व आठवणींची ही एक प्रकारची पोतडीच आहे. बाबा मी तुमचा नेहमी विचार करते. माझ्या हृदयात आणि रक्तात तुम्ही कायम आहात’ असे कॅप्शन दिले आहे.

Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
ED seize property
सलग दुसऱ्या दिवशी विनोद खुटेच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी मोहन गोखले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. चेन्नईत ‘हे राम’च्या चित्रीकरणासाठी गेलेले मोहन २९ एप्रिल १९९९ रोजी काळाच्या पडद्याआड गेले आणि चित्रपटसृष्टीने एक उत्कृष्ट अभिनेता गमावला.