News Flash

‘जब वी मेट’मधील सीन रिक्रिएट करणे श्वेता तिवारीला पडले महागात, भाजला हात

'मेरे डॅड की दुल्हन' या मालिकेच्या शूट दरम्यान हे घडले आहे.

‘जब वी मेट’मधील सीन रिक्रिएट करणे श्वेता तिवारीला पडले महागात, भाजला हात

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेत दिसत आहे. ती या मालिकेमध्ये गुनीत सिक्का ही भूमिका साकारत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्वेता तिवारीचा सेटवर अपघात झाला आहे. या अपघातात तिचा हात भाजला आहे.

‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेतील एका सीनमध्ये अभिनेता फहमान खान आणि श्वेता तिवारी शाहिद-करीनाच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटातील एक सीन रिक्रिएट करत होते. या सीनमध्ये श्वेता तिच्या खराब झालेल्या डेटचा राग काढण्यासाठी स्कार्फ आणि साडी जाळत असते. पण हा सीन शूट करत असताना आग मोठ्या प्रमाणवर लागते आणि तेथील पडदे देखील जळू लागतात. श्वेता ती विझवण्याचा प्रयत्न करते. पण सर्वांना ती सीनचे शूट करत असल्याचे वाटते. दरम्यान ती आग विझवतना तिचा हात भाजला आहे.

 

View this post on Instagram

 

D&D on an adventure drive! @badolavarun

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

खुद्द फहमानने या गोष्टीची माहिती दिली आहे. हा सीन शूट करत असताना सेटवर सर्वचजण मस्ती करत होते. श्वेता तिचा सीन शूट करत होती. अचानक पडद्यांना आग लागली. ती आग विझवण्याचा श्वेताचा प्रयत्न सुरु होता. पण सर्वांना तो श्वेताच्या अभिनयाचा भाग वाटला. सीन शूट झाल्यानंतर तिच्या हाताला भाजल्याचे समोर आले. श्वेताने अशाच परिस्थितीमध्ये शूट पूर्ण केले. श्वेताने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 8:13 pm

Web Title: shweta tiwari burns her hand while shooting for mere dad ki dulhan avb 95
Next Stories
1 घटस्फोटीत व्यक्तीशी लग्न करण्याच्या चर्चांवर अनुष्का संतापली, म्हणाली…
2 KGF स्टार यशने कापले मुलीचे केस, मुलीने असा काढला राग
3 पोलिसांच्या धाडसी वृत्तीचे पैलू पाडणारा ‘अहिल्या’
Just Now!
X