26 November 2020

News Flash

अभिनेत्री श्वेता तिवारी करोना पॉझिटीव्ह

ती सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने अद्यापही वाढतच आहे. सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. आता छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीला करोना झाल्याचे समोर आले आहे.

नुकताच श्वेताने ईटाइम्सशी संवाद साधला. त्यावेळी तिने तिची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून श्वेताची तब्बेत ठिक नव्हती. ‘१६ सप्टेंबर रोजी मला सर्दी झाली. त्यानंतर मी तातडीने माझी करोना चाचणी करुन घेतली. माझे घर मोठे असल्यामुळे मी स्वत:ला घरातच क्वारंटाइन करुन घेत आहे. पलक सोशल डिस्टंसिंगचे पालन करत आहे. हे सर्व आमच्यासाठी थोडे कठिण आहे. सेटवर देखील शुट करणे आता थोडे कठिण होत आहे’ असे श्वेताने म्हटले आहे.

श्वेता सध्या ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत काम करणारा अभिनेता वरुण बडोलाची पत्नी राजेश्वरी सचदेवला करोना झाल्याचे समोर आले होते. पण वरुणची करोना चाचणी निगेटीव्ह आली होती. आता श्वेताची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे करोनाबाधित

देशभरातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने ५६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 7:15 pm

Web Title: shweta tiwari tests positive for coronavirus avb 95
Next Stories
1 “असा चित्रपट पुन्हा होणे नाही”; सिद्धार्थ जाधवनं केलं ‘अशी ही बनवाबनवी’चं कौतुक
2 ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं निधन
3 ड्रग्ज प्रकरणात दीपिका, सारा, रकुल, श्रद्धा कपूरची पुढच्या तीन दिवसात NCB कडून चौकशी
Just Now!
X