News Flash

Video: मृण्मयीच्या ‘मिस यू मिस्टर’ला पाहिलत का?

हा चित्रपट २८ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

‘साटं लोटं पण सगळं खोटं’, ‘मी-आयुष्याच्या पलीकडे’ या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणार कलाकार म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे. आता सिद्धार्थ आणि मृण्मयी चाहत्यांसाठी आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्कच आहे.

या चित्रपटाचे नाव ‘मिस यू मिस्टर’ असे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला मृण्मयी आणि सिद्धार्थ हटके अंदाजात दिसत आहेत. सगळं काही सुरळती सुरु असताना अचानाक करिअरच्या संधीसाठी सिद्धार्थला परदेशात जावे लागते. तेथून त्यांच ‘लॉंग डिस्टनस रिलेशीप’ सुरु होते. सिद्धार्थ आणि मृण्मयी व्हिडीओ कॉलद्वारे ऐकमेकांशी संवाद असतात. काही काळानंतर एकमेकांनी दिलेली वचने पूर्ण होत नसल्याने दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. दोघांमध्ये भांडणे होण्यास सुरुवात होते असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. सध्या ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’सह झालेल्या एका मुलाखतीमध्ये मृण्मयीला चित्रपटासंबंधी अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. ‘मी या चित्रपटात कावेरीची भूमिका साकारणार आहे. तसेच माझ्यासह चित्रपटात मुख्य भूमितकेत असणाऱ्या सिद्धार्थसह काम करताना मला फार आनंद झाला. चित्रपटाची कथा ही एका कपलच्या आयुष्यात सुरु असलेली गुंतागुंत आणि समोर असलेल्या अव्हानांना सामोरे जाताना दाखवण्यात आली आहे’ असे मृण्मयी म्हणाली.

‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. याआधी समीर जोशींचे ‘मामाच्या गावाला जाऊ या’ आणि ‘बस स्टॉप’ या चित्रपटांतून अनेकांची मने जिंकली होती. आता त्यांच्या या आगामी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकतचा लागली आहे. मृण्मयी आणि सिद्धार्थसोबत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर हे कलाकार देखील झळकणार आहेत. हा चित्रपट २८ जून २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 1:50 pm

Web Title: siddarth chandekar and mrunmayee deshpande miss u mister movie trailer is out
Next Stories
1 वयाच्या ४५व्या वर्षीही स्वत:ला फिट ठेवणारी मलायका फॉलो करते ‘हा’ डाएट प्लान
2 रणबीर-आलियाचे वाराणसीतील हे फोटो पाहिलेत का?
3 नाटकाचं तिकिट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला?- सुमीत राघवन
Just Now!
X