बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एकदा आई-वडिलांचा विचार करा. असा सल्ला त्याने ड्रिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना दिला आहे.

“आयुष्यात कितीही संकटं आली तरी घाबरु नका त्या संकटांशी लढा. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधीना कधी नैराश्य येतं पण आत्महत्या हा त्यावरील उपाय असू शकत नाही. कुठलही चुकीचं पाऊल उचलण्यापूर्वी एकदा आपल्या आई-वडिलांचा विचार नक्की करा.” असा सल्ला सिद्धार्थने दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सुशांतचा थक्क करणारा प्रवास

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.