News Flash

‘आशिकी ३’साठी सिद्धार्थ-आलिया

सिद्धार्थला याबद्दल विचारणा झाल्यानंतर त्याने आपल्याला चित्रपटाची ऑफर आल्याचे सांगितले.

‘आशिकी २’ हिट झाल्यानंतर ‘आशिकी ३’चा घाट घातला गेला. ‘आशिकी २’ आला तेव्हा श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे दोघेही बॉलीवूडच्या नव्या फळीतील कलाकार एवढीच त्यांची ओळख होती. मात्र चित्रपट सुपरडुपर हिट झाला आणि हे दोघे एका रात्रीत बॉलीवूड स्टार झाले. त्यामुळे नव्या सिक्वलमध्ये कोण असणार, याबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटासाठी आलियाचा विचार केला जातो आहे, ही गोष्टबाहेर पडली तेव्हाच नायक म्हणून सिद्धार्थ मल्होत्राच्या नावाविषयी तर्क सुरू झाले होते. मात्र त्या वेळी सिद्धार्थच काय, कोणीच याबद्दल बोलायला तयार नव्हते. आता ‘बार बार देखो’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असतानाच आलिया आणि सिद्धार्थ ही जोडी ‘आशिकी ३’मध्ये दिसणार याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली. सिद्धार्थला याबद्दल विचारणा झाल्यानंतर त्याने आपल्याला चित्रपटाची ऑफर आल्याचे सांगितले. याबद्दल सध्या आलियाशी बोलणे सुरू आहे, मात्र अजून निर्णय झालेला नसल्याचेही सिद्धार्थने स्पष्ट केले. पडद्याबाहेरचे हे प्रेमी जोडपे पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र आले तर ‘आशिकी ३’ची लोकप्रियता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 6:19 am

Web Title: sidharth alia bhut together in aashiqui 3
Next Stories
1 सलमानच्या तोंडून ऐश्वर्याची तारीफ
2 आशाताईंच्या काश्मिरी गीतांना ‘सुवर्ण’ झळाळी
3 Sonali Kulkarni:’माझा बाप्पा माझ्यासारखा एकटा होता’
Just Now!
X