News Flash

‘बिग बॉस’च्या घरात पडली दुसरी विकेट; टीम हरताच या अभिनेत्यानं सोडलं घर

बिग बॉस १३ चा विजेता तिसऱ्याच आठवड्यात घराबाहेर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. हा शो सुरु होऊन आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याला मात्र शोमध्ये दिर्घ काळ टिकून राहता आलं नाही. तीसऱ्याच आठवड्यात तो ‘बिग बॉस’मधून एलिमिनेट झाला आहे. १४ व्या सीझनमध्ये शोमधून बाहेर पडणारा तो दुसरा स्पर्धक ठरला आहे.

अवश्य पाहा – “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

अवश्य पाहा – ‘बॉण्ड गर्ल’च्या पहिल्या बिकिनीचा होतोय लिलाव; किंमत ऐकून व्हाल थक्क

सिद्धार्थ १३ व्या सीझनचा विजेता आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्याला १४ सीझनमध्ये झळकण्याची संधी मिळाली. मात्र या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये त्याची टीम हरली त्यामुळे नियमानुसार बिग बॉसच्या घरातून तो एलिमिनेट झाला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्याच्या टीममध्ये गौहर खान आणि सना खान देखील होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांना देखील घरातून बाहेर जावं लागणार का? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:50 pm

Web Title: sidharth shukla hina khan and gauahar khan exit bigg boss 14 mppg 94
Next Stories
1 “आर्यन आणि न्यासा पळून गेले तर?”, शाहरुख आणि कजोलने दिले हे उत्तर
2 ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत समर्थ पाटील साकारणार ज्योतिबाचं बालरुप
3 लग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया
Just Now!
X