News Flash

‘मलाही अशी औषधे देण्यात आली होती ज्यामुळे मी…’,सिमी गरेवालचा सुशांतच्या चाहत्याला रिप्लाय

सध्या तिच्या या ट्विटची चर्चा सुरु आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवाल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती अनेकदा सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. सध्या सिमीचे एक ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये तिने मी नैराश्यामध्ये होते आणि सतत रडायचे असे म्हटले आहे. तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या एका चाहत्याच्या ट्विटला उत्तर देत हे म्हटले आहे.

सिमी गरेवालने ती नैराश्याचा सामना करत असताना तिला देण्यात आलेल्या औषधांवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने ‘मला आज ही लक्षात आहे जेव्हा मी नैराश्यामध्ये होते तेव्हा मला काही औषधे देण्यात आली होती. त्या औषधांनी मला अंधारात आणि नैराश्यामध्ये गेल्यासारखे वाटायचे. त्यामुळे मला सतत रडू कोसळायचे. औषधे तुम्हाला बरे देखील करु शकतात. पण कधीकधी त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो’ असे म्हटले आहे.

सुशांतच्या एका चाहत्याने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे वडिल डॉक्टर आहेत. त्यामुळे बनावट औषधे आणि प्रिस्क्रिप्शन मिळवणे तिला सोपे झाले होते. नैराश्याच्या गोष्टी या पुढे काम करणार नाहीत. रिया तुला लोकं वेडे आहेत असे वाटते का? असे ट्विटमध्ये म्हटले होते. सिमीने याच ट्विटवर उत्तर दिले होते. त्यामुळे तिचे ट्विट सध्या चर्चेत आहे.

सिमी गरेवालने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच काही शो देखील होस्ट केले आहेत. तिने ‘दो बदन’, ‘साथी’, ‘मेरा नाम जोकर’, ‘सिद्धार्थ’ आणि ‘कर्ज’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 4:13 pm

Web Title: simi garewal reply on sushant singh rajput fan tweet avb 95
Next Stories
1 ट्विटर वॉरमध्ये कंगनाची माघार; स्वरा भास्करच्या तक्रारीनंतर ‘ते’ ट्विट केलं डिलिट
2 अभिषेकच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’चा तिसरा सीझन येणार?
3 शहनाज गिलने भाड्याचे कपडे परत दिले नाहीत; डिझायनरचा आरोप