संगीतकार, गीतकार, पार्श्वगायक अशी विविधांगी भूमिका पार पाडणारी प्रख्यात संगीतकार जोडी म्हणजे अजय-अतुल. या जोडीने मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या कलागुणांची छाप पाडली. या विविधांगी भूमिका पार पाडल्यानंतर आता या जोडीतील अतुल गोगावले पहिल्यांदाच एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे.

अतुल गोगावले लवकरच छोट्या पडद्यावर सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडणार आहेत. एका वृत्तवाहिनीवरील प्रजासत्ताक दिनापासून ‘आपले भारतरत्न’ हा कार्यक्रम प्रसारित होणार असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ते करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील भारतरत्नांची यशोगाथा उलगडणार आहेत.

 

View this post on Instagram

 

Wish you all a very happy diwali !!! #ajayatul #happydiwali #traditionallook

A post shared by Atul Gogavale (@atul.ajayatul) on

आणखी वाचा : श्वानाने दिला हिरव्या रंगाच्या पिल्लाला जन्म, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

“या कार्यक्रमातून आम्ही महाराष्ट्र जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या ९ भारतरत्नांची यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेसमोर घेऊन येत आहोत”, असं अतुल यांनी सांगितलं. या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, जेआरडी टाटा, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख, पांडुरंग काणे या सर्वांची नावं माहित असली तरी त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.

आणखी वाचा : ‘परदेसी परदेसी’ गाण्यातील ‘ही’ अभिनेत्री आता काय करते?

 “भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झालेल्या अभिवंदनीय व्यक्तिमत्त्वात महाराष्ट्रातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे, त्यांची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला देणाऱ्या कार्यक्रमाचा भाग मला होता आले याचा खूप आनंद वाटतो”,असे अतुल गोगावले यांनी सांगितले.