News Flash

बायकोला सरप्राइज द्यायला गेला अन् गायकाला झाली घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक

पत्नीला सरप्राइज देण्यासाठी भारतातून गेला होता लंडनला

मंगळवारी ६ एप्रिल रोजी भारतीय ब्रिटीश गायक जग्गी डीला घरगुती हिंसाचार प्रकरणी लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला अटक झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी जग्गी दिल्लीत आला होतो. तेथे तो ‘द क्लेरियस’ या हॉटेलमध्ये थांबला होता. त्यानंतर लग्नाला ११ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे पत्नी किरणला सरप्राइज देण्यासाठी तो लंडनला रवाना झाला. पण नंतर जग्गी आणि किरणमध्ये भांडण झाले. भांडण इतके टोकाला गेले की किरणने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी जग्गीला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक केली.

जग्गी किरणला सरप्राइज देण्यासाठी लंडनला गेला होता. त्याला पाहून किरणदेखील आनंदी झाली होती. जग्गी घरी पोहोचताच किरणेने त्याचा फोन बोलता बोलता चेक केला. तेव्हा तिला काही अश्लिल मेसेज दिसले. नंतर द्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. किरणने मदतीसाठी लंडन पोलिसांना फोन केला आणि जग्गीला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Juggy D (@therealjuggyd)

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून किरणला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तिच्या आयुष्यातील कठिण काळ सुरु होता. जग्गीच्या वागण्यामुळे तिने लग्नाला ११ वर्षे पूर्ण होऊन आणि तीन मुले असतानादेखील वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

किरणने जग्गीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील दोन स्क्रीनशॉट शेअर केले होते. ज्यामध्ये एका व्यक्तीचे नाव ‘गुरु भारत’ या नावाने सेव्ह करण्यात आले होते. दोघांमध्ये अंमली पदार्था घेणे आणि मुंबई-दिल्लीमध्ये एस्कॉर्ट भाड्याने घेण्याबाबत संवाद होता. पण किरणने ही पोस्ट डिलिट केली. त्यानंतर जग्गीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत स्टोरी पोस्ट करत गुरु रंधवा आणि नवज्योत सिंग यांचा माझ्या खासगी आयुष्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 3:46 pm

Web Title: singer juggy d has been arrested charged with domestic violence in london avb 95
Next Stories
1 हिंदी मीडियम आणि खेड्यातील असल्याने बॉलिवूडमध्ये संघर्ष; पंकज त्रिपाठींचा खुलासा
2 ‘ब्रोकन ब़ट ब्युटिफूल ३’: सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठीच्या किसिंगचा व्हिडिओ व्हायरल
3 “राजकारण्यांच्या प्रचारसभा चालतात पण सामान्य व्यक्ती ऑफिसला नाही जाऊ शकत”
Just Now!
X