‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. लिटिल चॅम्प्समध्ये सगळ्यात ‘रॉकिंग परफॉर्मन्स’ लातूरच्या रोहित राऊतचा असायचा. प्रेक्षकांनाही रोहित ‘रॉक स्टार’ म्हणूनच माहिती आहे. हा लिटिल चॅम्प बघता-बघता कधी मोठा झाला कळलंच नाही. अशा या रॉकस्टारवर आजच्या घडीला अनेक तरुणी घायाळ आहेत. पण त्याच्यावर जीव जडलेल्या तरुणींचे हृदय तुटण्याची शक्यता आहे.

ज्या रॉकस्टारवर तरुण मुली जीव ओवाळून टाकतात त्या रोहित राऊतचा जीव मात्र एका मुलीमध्ये गुंतला असल्याचे दिसते. नुकताच रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंन्टवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने ‘चलो जी आज साफ साफ कहता हूँ’ असे कॅप्शन दिले आहे. फोटोची ही कॅप्शन पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण या फोटोत तो एकटा दिसत नसून, त्याच्यासोबत एक मुलगीदेखील दिसते. रोहितसोबत असलेल्या या मुलीचं नाव जुईली जोगळेकर असल्याचं कळतंय. एकंदरीतच रोहित – जुईलीचा हा फोटो आणि त्याला दिलेलं कॅप्शन यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रेमाचा बहर आल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. दरम्यान जुईलीनेसुद्धा हाच फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्याला ‘इतनी सी बात है, मुझे तुमसे प्यार है’ असे कॅप्शन दिले आहे.

रोहितने याबद्दल अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेला नाही. असे असले तरी त्यांना फॉलो करणाऱ्या युजर्सनीही तुम्ही दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये आहात का? असे प्रश्न कमेन्टमध्ये विचारले आहेत. दरम्यान, त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंन्टवर बऱ्याचदा त्याचे आणि जुईचे फोटो पाहावयास मिळतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत. प्रत्येक गाण्यातील त्याच्या आवाजाची जादू ही त्याच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करुन जाते.