News Flash

‘बर्थडे गर्ल’ सुनिधी चौहानला लागली मातृत्वाची चाहूल

सुनिधीला पाचवा महिना सुरु आहे.

सुनिधीने हितेश सोनिक याच्यासह १५ एप्रिल २०१२ रोजी लग्न केले होते.

प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानचा आनंद सध्या गगनात मावत नाहीये. आज वाढदिवस साजरा करत असलेल्या गायिकेकडे तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. सुनिधीला मातृत्वाची चाहूल लागली असून, हे तिचे पहिलेच बाळ आहे.

वाचा : घटस्फोटानंतर या गायिकेकडे राहण्यासाठी घरही नव्हतं

सुनिधीशी जवळीक असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, तिला पाचवा महिना सुरु आहे. तिने नातेवाईक आणि जवळचे मित्र वगळता याबद्दल कोणालाही सांगितलेले नाही. छायाचित्रकरांनी तिला मध्येच गाठू नये यासाठी तिने आता बाहेर जाणेही कमी केलेय. सुनिधी तिच्या बाळाला पाहण्यासाठी खूप उत्सुक असून, तिने बाळासाठी घरदेखील सजवण्यास सुरुवात केलीय. याचसोबत सुनिधीच्या वडिलांनीही त्यांचा आनंद व्यक्त केला. याविषयी ते म्हणाले की, ‘सुनिधीच्या आयुष्यात आता नवा अध्याय सुरु होणार असून, आम्ही खूप आनंदात आहोत. त्याचसोबत आम्हाला आता बाळाला पाहण्याची उत्सुकताही लागली आहे.’

वाचा : पुरुष सभ्य झालेत; त्यांनी ‘तो’ फोटो सेव्ह करायला हवा

सुनिधी आणि हितेशसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. सुनिधीने हितेश सोनिक याच्यासह १५ एप्रिल २०१२ रोजी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली आहेत. हितेश हा सुनिधीचा दुसरा नवरा असल्याचे फार कमी जणांना माहित असेल. या दोघांचे लग्न होण्यापूर्वी आपल्या लव्ह स्टोरीबद्दल हितेश म्हणालेला की, मेरी आवाज सुनो स्पर्धेच्या वेळी आमच्या दोघांची ओळख झाली. काळानुरुप तिच्या गाण्यात अधिक परिपक्वता येत गेली आणि तेव्हाच आमच्या मैत्रीच प्रेमात रुपांतर झाले. सुनिधी उत्तम गायिका आहे हा तिच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग झाला. पण, एक व्यक्ती म्हणूनही ती तितकीच चांगली आहे आणि त्यामुळेच मी तिच्यावर प्रेम करतो. ती माझ्या कुटुंबात अगदी सहज रुळली. माझे नातेवाईक तिच्यावर विसंबून राहतात. त्याचप्रमाणे मीसुद्धा तिच्या कुटुंबामध्ये अगदी सहज वावरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 2:54 pm

Web Title: singer sunidhi chauhan is five months pregnant
Next Stories
1 अंकिता लोखंडेच्या फोटोंची नेटिझन्सनी उडवली खिल्ली
2 लक्ष्मीकांत बेर्डे यांना गिरगावात राहण्याचा असाही झाला होता फायदा
3 ‘या’ तरुणीने चक्क जस्टीन बिबरला नाकारलं
Just Now!
X