24 November 2020

News Flash

‘सिंगिंग स्टार’चे स्पर्धक लोकसत्ता डिजिटल अड्डावर

२ सप्टेंबर बुधवारी सकाळी ११ वाजता

सोनी मराठी वाहिनीवरील सध्याचा सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे ‘सिंगिंग स्टार.’ या कार्यक्रमात पडद्यावर अभिनयाने अनेकांची मने जिंकणारे कलाकार एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहेत. ते आपल्या गाण्याच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज्य करत आहेत आणि प्रेक्षकांनाही हा थोडा हटके कार्यक्रम पाहणे प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमातील दोन स्टार जोड्या लवकरच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’च्या माध्यमातून तुमच्या भेटीस येणार आहेत. तुम्हालाही या कलाकारांनी गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे.

‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमातील आस्ताद काळे- सावनी रविंद्र आणि स्वानंदी टिकेकर- रोहित राऊत या दोन जोड्या ‘लोकसत्ता डिजिट अड्डा’च्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहेत. २ सप्टेंबर म्हणजे बुधवारी सकाळी ११ वाजता फेसबुक लाइव्हद्वारे आम्ही तुमच्या भेटीला येणार आहोत. मग तुमचे प्रश्न तयार आहेत ना? नक्की विचारा…

यासाठी लोकसत्ताच्या Loksattalive या फेसबुक पेजला लाइक करा आणि फॉलो करा… म्हणजे तुम्हाला या आणि अशा व्हिडीओ मुलाखतींमध्ये फेसबुकवर सहभागी होता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 10:37 am

Web Title: singing star astad kale savni ravindra and swanandi tikekar rohit raut special interview on loksatta digital adda avb 95
Next Stories
1 Video : गोपी बहु एका नव्या अंदाजात; ‘साथ निभाना साथिया २’चा टीझर प्रदर्शित
2 ‘चल लग्न करूया..’; जितेंद्र जोशीची पत्नीसाठी खास पोस्ट
3 ‘बिग बॉस मराठी 2’फेम अभिनेता अभिजीत केळकर करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X