‘मिस इंडिया’चा किताब स्वतःच्या नावावर असणं हे या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचं स्वप्न असतं. पण एक अभिनेत्री अशीही आहे जिला हा स्वप्नपूर्तीचा मुकूट न वाटता काटेरी मुकूट वाटला. २०१३ ची मिस इंडिया सोभिता धुलिपलाने हा किताब मिळाल्यानंतरचे तिचे आयुष्य कसे बदलले ते सांगितले.

https://www.instagram.com/p/Bcz8YTHnUWC/

हा किताब जिंकल्यानंतर स्वतःवरचा विश्वास डळमळीत झाला होता. माझ्या मित्रांनी मला मिस इंडिया स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले होते. माझ्या मित्रांना सिद्ध करण्यासाठी मी या स्पर्धेत भाग घेतला. मला फक्त पहिल्या फेरीपर्यंत जायचे होते. पण त्यानंतर आपण अजून पुढे जाऊ शकतो ही भावना माझ्या मनात निर्माण झाली आणि मी प्रत्येक फेरी पार करत गेले. पण मुकुटापर्यंत पोहचेपर्यंत माझा आत्मसन्मान डरमळला होता.

https://www.instagram.com/p/Bbo_rAIHFJj/

सोभिता म्हणाली की, आयुष्यात पहिल्यांदा मला सन्मान मिळाला होता. पण या सन्मानामुळे माझं खच्चीकरण झालं. हा किताब तर मिळाला पण मी स्वतःपासून फार दूर झाले. मी मनातून स्वतःला फार कमकूवत मानत होते. मिस इंडिया होण्याच्या प्रवासात ते तुम्हाला अशी व्यक्ती बनवतात जी फार आकर्षक असते, मनोरंजन करणारी असते. पण तुम्ही अंतर्मनातून तुम्ही काय विचार करता याकडे कोणाचंही लक्ष नसतं.

https://www.instagram.com/p/BV31vTfjCOp/

२०१३ मध्ये मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर सोभिता स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करायची. मला स्वतःची अशी काहीच ओळख नाही असेच मला वाटू लागले होते असेही ती म्हणाली. सोभिताने अनुराग कश्यपच्या रमन राघव २.० सिनेमात काम केले होते. आता ती सैफ अली खानच्या कालाकांडी सिनेमात दिसणार आहे.

या दोन सिनेमांशिवाय ती २०१४ मध्ये किंगफिशर कॅलेंडरवरही झळकली होती. तसेच २०१३ मध्ये तिने मिस अर्थ कँपेनसाठी भारताचे प्रतिनिधित्व केले होते.