28 November 2020

News Flash

आधी संन्यास, मग लग्न, आता घटस्फोट, सोफियानं पतीला काढलं घराबाहेर

नन सोफिया वर्षभरापूर्वी विवाहबंधनात अडकली. आता लग्न होऊन वर्षही पूर्ण होत नाही तोच तिनं पती व्लादशी घटस्फोटही घेतला आहे.

२४ एप्रिल २०१७ ला सोफियाने व्लाद स्टेनेस्कुशी लग्न केलं होतं.

बिग बॉगसची माजी स्पर्धक आणि मॉडेल सोफिया हयात ही वादग्रस्त वक्तव्य आणि तितक्याच वादग्रस्त आयुष्यासाठी ओळखली जाते. कधी मॉडेल तर कधी सर्व सूखांपासून तिनं घेतलेला संन्यास हा चर्चेचा विषय असतो. सर्व मोहमायेचा त्याग करून अध्यात्मच्या वाटेवर निघालेल्या सोफियाचं मन लवकरच याही गोष्टीतून उडालं अन् ही नन वर्षभरापूर्वी विवाहबंधनातही अडकली. आता लग्न होऊन वर्षही पूर्ण होत नाही तोच तिनं पती व्लादशी घटस्फोटही घेतला आहे.

‘तू इंटिरिअर डिझायनर आहे असं तू मला खोटं सांगितलं. पण आपण कर्जात पुरते बुडलो आहोत. तू माझ्याकडून सर्वच चोरून नेलं. तूझ्या खाण्यापिण्यापासून ते कपड्यांपर्यंत सगळाच खर्च मी केला. एवढं मला लुबाडलं अजून तूला किती लुबाडायचं आहे? माझं तुझ्यावर प्रेम आहे पण तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. मला अनेकांनी सांगितलं की तुझ्याशी लग्न करू नकोस. तूझ्याजवळ पैसाही नव्हता ना घर. पण मी कोणाचंही ऐकलं नाही. तूला राहायला घरं दिलं. पण आता मी तूला माझ्या आयुष्यातून आणि घरातूनही बाहेर काढत आहे’ अशी पोस्ट लिहिती पती व्लादसोबत नातं संपुष्टात आलं असल्याची कबुली तिनं दिली.

२४ एप्रिल २०१७ ला सोफियाने व्लाद स्टेनेस्कुशी लग्न केलं होतं. पतीसोबत ती नेहमी रोमँटीक फोटो शेअर करत असे. त्यानंतर तिला ट्रोलही केलं गेलं होतं. तसेच ती गर्भवती असल्याच्याही चर्चा होत्या. पण आता पती व्लादला तिनं खोटारडा ठरवून आपलं नातं संपलं असल्याचं कबुल केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 6:16 pm

Web Title: sofia hayat opens up about her split from vlad
Next Stories
1 ‘मिस हवाहवाई’च्या जीवनप्रवासासाठी ‘या’ तीन नावांना पसंती?
2 खुशीच्या फोनच्या वॉलपेपरवरील श्रीदेवी यांचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल
3 प्रियांकाने लग्न केलंय म्हणे… चर्चा तर होणारच
Just Now!
X