गेले काही दिवस अभिनेत्री सोनम कपूर बरीच चर्चेत होती. या वर्षी तिने ‘नीरजा’ या चित्रपटातून केलेल्या अभिनयामुळे सोनमने अनेकांची प्रशंसा मिळवली होती. चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांनीही या चित्रपटातील सोनमने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला दाद दिली होती. याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर नीरजा भानोतच्या कुटुंबायांसाठीही सोनम एका सदस्याप्रमाणेच वाटू लागली. दरम्यान एका पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सोनमला एक बहुमान मिळाला आहे.

वाचा: आजची आघाडीची अभिनेत्री सोनमला बनायचे होते दिग्दर्शक

सामाजिक न्याय या प्रवर्गातील ‘द मदर तेरेसा मेमोरियल इंटरनॅशनल अॅवॉर्ड २०१६’ या पुरस्कार सोहळ्यासाठी सोनम कपूर प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सोमनने भनोत कुटुंबियांच्या वतीने एक पुरस्कार स्वीकारला. सदर कार्यक्रमामध्ये त्यावेळी नीरजा भानोतचे कुटुंबियही उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये नीरजाने तिच्या भावनांना शब्दांच्या रुपाने वाट मोकळी करुन दिली. ‘एका २२ वर्षीय मुलीमध्ये (नीरजामध्ये) असलेले प्रेम, काळजी आणि सहनशीलता हे गुण आपणही आत्मसात केले पाहिजेत. हिंदू-मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव न करता केवळ मानवतेच्या नजरेने सर्वांना पाहत तिने अनेकांचे प्राण वाचवले’, असे सोनम प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाली.
‘हल्लीच्या दिवसांमध्ये इतरांवर दया दाखवणं कठीण मानलं जात आहे. पण ‘नीरजा’कडून मी हेच शिकले. आणि त्यासाठी मदर तेरेसा यांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार अगदी योग्यच आहे असेही सोनम म्हणाली’. भानोत कुटुंबियांसह व्यासपीठावर उपस्थित राहत त्यांच्या वतीने सोनमने पुरस्कार स्वीकारला.

दरम्यान ‘नीरजा’ या चित्रपटामुळे सोनम कपूरच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती. राम माधवानी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सोनम कपूर ‘नीरजा भानोत’ च्या भूमिकेत झळकली होती. एका सत्यघटनेवर आधारित या चित्रपटामुळे काळाच्या पडद्यायाड गेलेली नीरजा भानोतची कहाणी पुन्हा एकदा जिवंत करण्याच आली होती.

वाचा: सोनम आणि राधिका बनल्या आयकॉन ऑफ इंडिया