News Flash

सोनम लग्नात कोणता ड्रेस घालणार समजलं का ?

सोनम- आनंद यांच्या लग्नाबद्दल रोज नवनवीन खुलासेही होत आहेत. त्यातच आता एक आणखी नवा खुलासा झाला आहे, तो म्हणजे ती लग्नाला कोणता ड्रेस घालणार याचा...

सोनम कपूर

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. सोनमच्या चाहत्यांमध्ये लग्नाच्या तारखेची प्रचंड उत्सुकता आहे. ही ताणलेली उत्सुकता कमी करत अखेर सोनमने लग्नाची तारीख जाहीर केली. सोनमचे लग्न येत्या ८ मे रोजी प्रियकर आनंद आहुजा यांच्याबरोबर होणार आहे. सोनम- आनंद यांच्या लग्नाबद्दल रोज नवनवीन खुलासेही होत आहेत. त्यातच आता एक आणखी नवा खुलासा झाला आहे, तो म्हणजे ती लग्नाला कोणता ड्रेस घालणार याचा…

लग्नाच्या तारखेप्रमाणेच लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे स्थळ, तिची लग्न पत्रिका हे चर्चेचे विषय ठरत आहेत. आता यात आणखी एक भर पडली ती म्हणजे सोनम लग्नात कोणत्या डिझायनरने डिझाइन केलेले कपडे घालणारा याची… मुंबईमध्ये होणाऱ्या या विवाहसोहळ्यात सोनम अनामिका खन्ना या डिझायनरने डिझाइन केलेला लेहंगा घालणार आहे.

काही दिवसांपूर्वी सोनम एका मासिकाच्या मुखपृष्ठावर नववधुच्या अवतारात झळकली होती. यावेळी तिने परिधान केलेला लेहंगा अनामिकानेच डिझाइन केला होता. तेव्हापासूनच सोनमच्या लग्नात अनामिकाच तिचा ड्रेस डिझाइन करणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. विशेष म्हणजे सोनमचे आतापर्यंत अनेक ड्रेस अनामिकानेच डिझाइन केलेले आहेत.

यापूर्वी उदयपूरला सोनमचे डेस्टिनेशन वेडिंग होणार होते. मात्र काही कारणास्तव ते रद्द करुन आता हा विवाहसोहळा मुंबईतील हेरिटेज हवेली येथे रंगणार आहे. या लग्नामुळे आनंद आणि सोनम या दोघांच्याही परिवारात आनंदाचे वातावरण पसरले असून दोन कुटुंबियांमधील नात्यांची दोर अजून घट्ट होईल, यात काही शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 1:48 pm

Web Title: sonam kapoor marriage clothes will design by anamika
Next Stories
1 Video: …जेव्हा अर्जुन बहिणी आणि काकूंच्यामध्ये फसतो
2 राजकुमार रावच्या ‘ओमर्ता’ चित्रपटातील नग्न दृश्यांवर सेन्सॉरची कात्री
3 प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाच्या सेटवरील फोटो पाहिले का?
Just Now!
X