01 October 2020

News Flash

‘सोनम दी वेडिंग’, स्वित्झर्लंडमध्ये पार पडणार सोनम कपूरचा शाही विवाहसोहळा

अभिनेत्री सोनम कपूर लवकरच बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये अत्यंत शाही थाटात हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सोनम कपूर, आनंद अहुजा

अभिनेत्री सोनम कपूर लवकरच बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये अत्यंत शाही थाटात हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. ११ आणि १२ मे असा दोन दिवस हा सोहळा असणार आहे. सोनम कपूरचे कुटुंबिय आणि इंडस्ट्रीमधील जवळचे मित्र लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास एक आठवड्यासाठी सर्वजण स्वित्झर्लंडमध्ये असणार आहेत. एक आठवडा लग्नाचं सेलिब्रेशन चालणार आहे.

‘आमच्यातील अनेकजण मुंबईतून निघणार आहे. आनंद आणि त्याचे कुटुंबिय कदाचित दिल्लीमधून विमानाने निघतील. लग्न आणि इतर कार्यक्रम दोन दिवस चालणार आहेत. पण तयारी आणि इतर कामांसाठी आम्ही लवकरच निघणार आहोत. मी स्वत: तिथे चार दिवसांसाठी असणार आहे’, अशी माहिती सोनम कपूरच्या एका जवळच्या मित्राने डीएनएशी बोलताना दिली आहे.

लग्नाआधी सोनम कपूर आणि आनंद अहुजाचा साखरपुडाही पार पडणार आहे. लग्नासाठी काही ठराविक लोकांनाच आमंत्रण दिलं जाणार आहे.

सोनम कपूरचा आगामी चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ चं शुटिंग पूर्ण झालं आहे. यानंतर ती लग्नाच्या तयारीला लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. याआधी सोनमचं लग्न राजस्थानमधील उदयपूरमध्ये होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता हा सोहळा स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे यावर शिक्कामोर्तब झालंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 2:02 am

Web Title: sonam kapoor to get marry with boyfriend anand ahuja
Next Stories
1 …म्हणून रिमीनं अभिनयापासून दूर जाण्याचा घेतला निर्णय
2 सलमानला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे मोबाइल लंपास, १९ वर्षीय तरुणाला अटक
3 रणवीर सिंगला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
Just Now!
X