‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’असलेला हा विठ्ठल अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. अनेक संतांनी आपल्या रचनांमधून विठ्ठलाची आळवणी के ली तर कधी त्याला आपला सखा, मित्र मानून आपले सुख-दु:ख त्याला सांगितले. या विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी आषाढी एकोदशीच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो विठ्ठलभक्तांची अर्थात वारक ऱ्यांची मांदियाळी जमा होते. विठ्ठल-रखुमाई, वारी, विठुनामाचा गजर हा मराठी सिनेमातून, नाटकोतून आणि गाण्यांमधूनही कित्येकदा अनुभवता आला आहे. ‘इंद्रायणी कोठी’ या पुलंच्या ‘गुळाचा गणपती’ चित्रपटातील गाण्यापासून ते आजच्या ‘लय भारी’तील ‘माउली माउली रूप तुझे’या गाण्यापर्यंत विठ्ठलाची कि तीएक गाणी रसिकोंच्या ओठावर आहेत.
आषाढी एकोदशीच्या निमित्ताने चित्रपटातील विठ्ठलभक्तीच्या गाण्यांचा हा धावता आढावा..
चित्रपट-नाटकोतील विठ्ठल गाणी
‘इंद्रायणी कोठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची’ हे गाणे, अभंग आजही लोकप्रिय आहे. हा अभंग क ोणा संतांचा नाही तर ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे त्या ग. दि. माडगूळक र यांनी तो लिहिला आहे. ‘गुळाचा गणपती’  या चित्रपटातील हे गाणे ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे यांच्यावर चित्रित क रण्यात आले आहे. दस्तुरखुद्द ‘पुलं’नी संगीतबद्ध के लेले हे गाणे पं. भीमसेन जोशी यांनी गायले आहे. ‘गोरा कु ंभार’ या नाटकोतील अशोक जी परांजपे यांचे ‘अवघे गर्जे पंढरपूर’ हे प्रकोश घांग्रेक र यांनी गायलेले, सुधीर फ डके यांच्या स्वरातील ‘एक तारी संगे एक रू प झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो’ यासह ‘झाला महार पंढरीनाथ’ या चित्रपटातील पं. वसंतराव देशपांडे आणि सुधीर फ डके यांनी गायलेले ‘कोनडा राजापंढरीचा, वेदांनाही नाही क ळला अंतपार याचा’ हे गाणे आपल्यालाही तल्लीन क रते. पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या अनेक  ण्यांमध्ये ‘कैवल्याच्या चांदण्याला भुके ला चकोर’ हे ‘गोरा कुं भार’ नाटकोतीले पद विठ्ठल भक्तीवरील आहे. ‘संत गोरा कुंभार या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या आवाजातील ‘तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुजे नाम’, सुधीर फडके यांच्याच स्वरातील ‘प्रपंच’ चित्रपटातील ‘फिरत्या चाकोवरती देसी मातीला आकोर, विठ्ठला तू वेडा कुं भार’, ‘अरे संसार संसार’ चित्रपटातील ‘विठू माउली तू माउली जगाची, माउलीत मूर्ती विठ्ठलाची’ हे सुधीर फ डके यांच्यासह जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजातील गाणेही ‘विठ्ठल’लावरील लोक प्रिय गाण्यांपैकी एक आहे. ‘देवकीनंदन गोपाला’ चित्रपटातील पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट’, ‘भोळी भाबडी’ या चित्रपटातील पं. भीमसेन जोशी आणि पं. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातील ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग’ ही गाणी रसिक आजही विसरलेले नाहीत.

पं. भीमसेन जोशी यांची ‘अभंगवाणी’
विठ्ठल महिमा आणि विठ्ठल भक्ती असलेल्या गाण्यांमध्ये पं. भीमसेन जोशी यांच्या ‘अभंगवाणी’ला विशेष महत्त्व आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ‘कोया ही पंढरी आत्मा पांडुरंग’, ‘जाता पंढरीस सुख वाटे’, ‘जे को रंजले गांजले’, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘पंढरीचा वास चंद्रभागे’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘सावळे सुंदर रूप मनोहर’, ‘आता कोठे धावे मन’, ‘नामाचा गजर गर्जे भीमातीर’ आदी गाणी देहभान हरपून टाकू न मनाला शांतता देतात.

Venkateswara Mahaswami who has stood on three Lok Sabha seats is in trouble
तीन लोकसभा जागांवर उभे राहिलेले व्यंकटेश्वरा महास्वामी अडचणीत; गुन्हा दाखल होणार
Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
Mukh Darshan Arranged for Devotees on Gudhi Padwa at Pandharpur Temple due to Conservation Work
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज
dharashiv, tulja bhavani
तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणारे फरारच! प्रमुख तीन संशयितांची नार्को टेस्ट करा : गंगणे

प्रल्हाद शिंदे यांचा वेगळा ठसा
गायनाच्या क्षेत्रात आपल्या पहाडी आवाजाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे गायक प्रल्हाद शिंदे यांनीही गायलेली कोही विठ्ठल गाणी आजही लोक प्रिय आहेत. सत्यनारायण पूजा किं वा आषाढी/कोर्तिकी एकोदशीच्या निमित्ताने ही गाणी सर्वदूर ऐकू येतात. ‘चल ग सखे, चल ग सखे पंढरीला’, ‘चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी’, ‘पाऊ ले चालती पंढरीची वाट’ यांचा यात समावेश आहे.

अन्य लोक प्रिय विठ्ठल गाणी
* अगा वैकुंठीच्या राया’-पं. राम मराठे (नाटक -संत कोन्होपात्रा)
* चला पंढरीसी जाऊ ’, ‘आधी रचिली पंढरी’-मन्ना डे.
* बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’- पं. जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर.
* आली कु ठुनशी कोनी साद, टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल’- वसंत आजगावकर.
* पंढरीनाथा, झडक री नाथा’, ‘कोनडाऊ विठ्ठलु, करनाटकू ’, ‘पांडुरंग कोंती दिव्य तेज झळक ती’,
‘ये गं ये गं विठामाई’, ‘विठू माझा लेकु रवाळा’-आशा भोसले.
* जन विजन झाले आम्हा-रामदास कोमत
* अवघा रंग एक झाला’-किशोरी आमोणकर.
* आनंदाचे डोही आनंद तरंग’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी’, ‘भेटीलागे जीवा लागली से आस’, ‘विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला’, ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’-लता मंगेशकर.
* देव माझा विठू सावळा’, ‘देह जावो अथवा राहो’, ‘सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले’-सुमन क ल्याणपूर.
* दिंडी चालली, चालली विठ्ठलाच्या दर्शनाला’-देवदत्त साबळे.
* निर्गुणाचा संग धरिला जो आवडी’ -फैय्याज (नाटक -गोरा कुं भार)
* या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’-शाहीर साबळे
* विठ्ठल आवडी प्रेमभावो’- सुरेश वाडकर.
विठ्ठलभक्तीच्या गाण्यांचा हा प्रवास अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘लई भारी’ चित्रपटापर्यंत येऊन पोहोचतो. चित्रपटातील ‘माउली माउली’ गाण्याने अमाप लोक प्रियता मिळविली आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे राजपथावर महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ ‘वारी’ या विषयावरच तयार करण्यात आला होता. चित्ररथाच्या संचलनाच्यावेळीही ‘माउली माउली’ हे गाणे वाजविण्यात आले. गुरु ठाकूर यांचे सहज व सोपे शब्द, अजय-अतुल यांचे विठ्ठलभक्तीत तल्लीन करणारे आणि भान हरपायला लावणारे संगीत आणि स्वर यामुळे हे गाणे विठ्ठलभक्तीचा कळसाध्याय ठरले आहे.