भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईवर आधारित एक वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘अवरोध: द सीज विदीन’ असं या सीरिजचं नाव आहे. भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची कथा सांगणाऱ्या या सीरिजवर अभिनेता सोनू सूद याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. जर तुम्ही भारतीय आर्मीचे फॅन असाल तर तुम्ही ही सीरिज पाहायलाच हवी, असा सल्ला त्याने आपल्या चाहत्यांना दिला आहे.

“सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता”; अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

सोनू सूदने ‘अवरोध: द सीज विदीन’ या सीरिजची स्तुती करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “मी आर्मी चित्रपट, मालिकांचा प्रचंड मोठा फॅन आहे. मी असे शो आवर्जून पाहातो. अलिकडेच माझ्या एका मित्राने मला ‘अवरोध’ पाहण्याचा सल्ला दिला होता. ही सीरिज मला प्रचंड आवडली. मी रात्री खूप लवकर झोपतो परंतु ही सीरिज मी रात्रभर जागून पाहिली आहे. तुम्ही देखील ही सीरिज आवर्जून पाहा.” असं म्हणत सोनूने ‘अवरोध’ या सीरिजचं कौतुक केलं आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट फलंदाज विरेंद्र सेहवाग याने देखील या सीरिजची स्तुती केली होती.

“दान नकोय आम्हाला काम हवय”; जेष्ठ अभिनेत्री महाराष्ट्र सरकारवर संतापल्या

राहुल सिंग आणि शिव अरूर यांनी लिहिलेलं पुस्तक ‘इंडियाज मोस्ट फीअरलेस’मधील ‘वी डोण्ट रिअली नो फीअर’ या पहिल्या प्रकरणावर बेतलेली ही सीरिज आहे. अनेक महिने विस्तृत संशोधन केल्यानंतर आणि लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या घटनेकडे विविध कोनांतून बघणारी कथा आकाराला आली आहे. या सीरिजवर टीमने दोन वर्षांहून अधिक काळ मेहनत घेतली आहे. राज आचार्य यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अवरोध’मध्ये अमित साधने मेजर टांगो ही भूमिका साकारली आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या ३५ वर्षीय अधिकाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे हे पडद्यावरील स्वरूप आहे. याशिवाय दर्शन कुमार, पावैल गुलाटी, नीरज कबी, मधुरिमा तुली, अनंत महादेवन, विक्रम गोखले आणि आरिफ झकेरिया हे कलावंत विविध भूमिका साकारत आहेत.