News Flash

“फक्त लग्नासाठी मुलगी घेऊन ये…मंत्र मी वाचतो”- सोनू सूद

चाहत्याला दिला भन्नाट रिप्लाय

अभिनेता सोनू सूदला देशभरातून लोकांकडून मदतीची मागणी करणारे मेसेज येत आहेत. कोणी मेडिकल बिल भरा म्हणत आहे, तर कोणाला घरभाडं भरण्यासाठी पैश्यांची गरज आहे. आणि सोनू सूदही प्रत्येक व्यक्तीला शक्य ती सर्व मदत करत आहे. पण त्यातल्या काहींनी तर फारच विनोदी कारणांसाठी त्याची मदत मागितली आहे.

सोमवारी एका चाहत्याने सोनूला त्याच्या लग्नासाठी मदत करण्याची  विनंती केली आहे.  “सर, तुम्ही लग्न लावून देऊ शकता का?” असा सवाल सोनूच्या एका चाहत्याने त्याला विचारला  आहे. त्याला सोनूनेही तोडीस तोड उत्तर दिलं आहे. तो म्हणतो, “का नाही? लग्नाचे मंत्रही वाचेन, फक्त मुलगी शोधायची मेहनत तुम्ही करा.”


या आधी बऱ्याच लोकांनी सोनूला विचारलं होतं की आम्हाला गाडी घेऊन द्याल का, मालदिवची ट्रीप स्पॉन्सर कराल का, आमचा घटस्फोट करून द्याल का.

ज्याने मालदिवच्या ट्रीपबद्दल विचारलं त्याला रिप्लाय देताना सोनू म्हणतो, कसं जाणार, सायकलवर की रिक्षाने? तर ज्याने गाडी मागितली आहे, त्याला उत्तर देताना तो म्हणतो, सेल्फ ड्राईव्ह कार हवी आहे की मी चालवायची आहे गाडी? मला सांगा कसी गाडी तुम्हाला आवडेल आणि गाडीतला एसी कितीवर ठेवायचा तेही सांगा.

सोनूने लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांना आपल्या घरी पोहोचवलं होतं. त्याच्या या कामासाठी यासाठी त्याला संयुक्त राष्ट्रांकडून पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 4:33 pm

Web Title: sonu sood gives hilarious reply to the man on twitter vsk 98
Next Stories
1 बर्थडे स्पेशल: “बॉलिवूडमध्ये माझा मित्र कोण माहित नाही पण माझा शत्रू तरी कुणी नाही?”
2 राखी सावंतच्या नवऱ्याचं रहस्य उलगडणार?
3 “लाल साडी आणि भेदक नजर… मितालीच्या बोल्ड लूकवर चाहते फिदा
Just Now!
X